Global Hunger Index 2020: जागतिक भूक निर्देशांक अहवालात भारताची परिस्थिती अतिशय गंभीर; 107 देशांच्या यादीत भारत 94 व्या स्थानी

यावर्षी जगभरातील 107 देशांच्या यादीत भारत (India) 94 व्या स्थानी आहे

Hunger (Photo Credit: PTI)

जागतिक भूक निर्देशांक 2020 (Global Hunger Index 2020) अहवाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी जगभरातील 107 देशांच्या यादीत भारत (India) 94 व्या स्थानी आहे. या अहवालानुसार, कुपोषणाच्या बाबतीत भारत 27.2 गुणांसह भारताची परिस्थिती अतिशय गंभीर असल्याचे समोर येत आहे. भारताच्या 94 व्या क्रमांकाचा अर्थ असा की केवळ 13 देश भारतापेक्षा वाईट परिस्थितीमध्ये आहेत. भारत गेल्या वर्षी 117 देशांच्या यादीत 102 व्या स्थानावर होता. महत्वाचे म्हणजे, भारताच्या रॅंकिंगमध्ये सुधारणा झाली आहे.परंतु, एकूण देशांच्या संख्येतही घट झाली आहे. भारत शेजारच्या अनेक देशांपासून मागे आहे. यात नेपाळ (73), पाकिस्तान (88), बांग्लादेश (75), इंडोनेशिया (70) यांसारख्या देशाचा समावेश आहे.

जागतिक भूक निर्देशांका वार्षिक अहवालानुसार, या यादीत भारताच्या मागे केवळ 13 देश आहेत. यात रवांडा (97), नाइजीरिया (98), अफगाणिस्तान (99), लीबिया (102), मोजाम्बिक (103) चाड (107) यांसारख्या देशाचा समावेश आहे. भारतातील सुमारे 14% लोक कुपोषित आहेत. तसेच भारतातील लहान मुलांमध्ये स्टंटिंगचे प्रमाण 37.4 टक्के आहे. तसेच ज्या मुलांची लांबी त्यांच्या वयापेक्षा कमी असते आणि ज्यात भयंकर कुपोषण दिसते, स्टन्ड म्हटले जाते. हे देखील वाचा- Immunity Against COVID-19: कोरोना व्हायरसपासून बरे झाल्यानंतर 5 महिन्यांपर्यंत अबाधित राहते रोगप्रतिकारशक्ती; रिसर्चमधून खुलासा

दरवर्षी जागतिक भूक निर्देशांक अहवाल जाहीर केला जातो. कमी पोषण, उंचीच्या तुलनेत कमी वजन, पाच वर्षांखालील मुलांचे उंचीच्या तुलनेत कमी वजन, मुलांची वाढ खुंटणे, कुपोषण, बालमृत्यू दर, पाच वर्षांखालील मुलांचा मृत्यू दर हे घटक यात विचारात घेतले जातात. जगात 2030 पर्यंत एकही कुपोषित आढळता कामा नये, असा त्यांचा उद्देश आहे. संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकासाचे हे एक लक्ष्य आहे. एखादी व्यक्ती किती कॅलरी घेतो याच्या आधारे भूक मोजली जाते. परंतु ग्लोबल हंगर इंडेक्स स्वत: ला या व्याख्येपर्यंत मर्यादित करीत नाही. ते कोणत्याही देशास चार प्रमाणांवर तपासते आणि ही प्रमाण अनेक स्तरांवर चाचणी घेते. म्हणूनच हा एक मजबूत डेटा म्हणून वापरला जातो.