'सुरक्षेच्या नावाखाली, बसमध्ये पुढच्या रांगेत मुलींना बसू देत नाही'; शार्क टँक जज Vinita Singh यांची मुलाच्या शाळेतील नियमांवर आगपाखड

शुगर कॉस्मेटिक्सच्या सीईओ विनिता सिंह यांनी सोशल मीडिया अकाउंटवर एक संतापजनक पोस्ट शेअर करत त्यांच्या मुलाच्या शाळेत मुलींच्या सुरक्षेच्या नावाखाली (बस चालकाशी संपर्क कमी करण्यासाठी) त्यांना बसच्या मागच्या सीटवर बसण्याचा सल्ला देण्यात आल्याचे म्हटले आहे.

Photo Credit- Instagram

Vinita Singh: आज शाळकरी मुली आणि महिला स्वतंत्र्य आहेत की पिंजऱ्यात? याबाबत शंका उपस्थित झाली आहे. कारण नुकत्याच एका घटनेत शुगर कॉस्मेटिक्सच्या सीईओ विनिता सिंह यांनी पोस्ट केली. ज्यात शाळेच्या बसमध्ये मुलींची सुरक्षितता सुनिश्चित(Women safety) करण्यासाठी, मुलींना पहिल्या सीटवर बसण्यास नकार (Gender Inequality)दिला गेला. अशा नियमांचे पालन करणे, आणि पुढे बसावे की मागे बसावे? याबाबत पालकांसह विद्यार्थीनींनीमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. असे मत त्यांनी शेअर केले आहे. शाळकरी मुलींबाबतचा हा नियम त्यांच्या स्व:ताच्या मुलाच्या शाळेत लावला गेला आहे. (हेही वाचा: Kolkata Rape And Murder Case: कोलकाता बलात्कार आणि खून प्रकरणातील आरोपी संजय रॉय याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी)

शुगर कॉस्मेटिक्सच्या सीईओ विनिता सिंह यांनी सोशल मीडिया अकाउंटवर एक संतापजनक पोस्ट शेअर करत त्यांच्या मुलाच्या शाळेत मुलींच्या सुरक्षेच्या नावाखाली तयार केलेल्या नियमावर ताशेरे आढले आहेत. मुलींना पहिला रो सोडून बसच्या मागच्या सीटवर बसण्याचा सल्ला देण्यात आल्याचे त्यांनी पोस्टमधये म्हटले आहे. जेणेकरून मुलींचा बस चालकाशी संपर्क कमी करता होईल. शाळेत शिकणाऱ्या मुलींच्या सुरक्षेसाठी ही पद्धत आखण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.

विनीता सिंह यांची सोशल मीडिया पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Vineeta Singh (@vineetasng)

कोलकाता येथे महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 12 वर्षांपूर्वी जेव्हा निर्भया हत्याकांड घडले तेव्हाही अशाच प्रतिक्रिया आल्या. निर्भया प्रकरणानंतर देशात अनेक कायदे करण्यात आले, अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या, पण 12 वर्षे उलटूनही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. भारत अजूनही महिलांसाठी जगातील असुरक्षित देशांपैकी एक आहे. पण जेव्हा जेव्हा मुलींच्या सुरक्षेची चर्चा होते तेव्हा त्यांच्यासाठी काही नवीन नियम केले जातात.