Jharkhand: गर्लफ्रेंडने ब्लेडने कापला प्रियकराचा प्रायव्हेट पार्ट; पीडित तरुणाची प्रकृती चिंताजनक
यावर घनश्यामने तिच्याशी लग्न करून तिला सोबत ठेवण्याचे आश्वासन दिले होते. लग्नास नकार दिल्याने रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तारातंड मैदानाजवळ दोघांमध्ये भांडण झाले.
Jharkhand: अनेक महिने लैंगिक अत्याचार केल्यानंतर लग्नास नकार दिल्याने महिलेने तरुणाचा प्रायव्हेट पार्ट (Private Part) ब्लेडने कापला. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी SNMMCH धनबाद येथे नेण्यात आले, तेथे त्याची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना तरतांड गावात घडली. 32 वर्षीय विवाहित घनश्याम राय याचे गावातील एका विवाहित महिलेसोबत गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. लग्नाच्या बहाण्याने तो तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होता.
महिलेच्या पतीने तिला सोबत ठेवण्यास नकार दिला होता. यावर घनश्यामने तिच्याशी लग्न करून तिला सोबत ठेवण्याचे आश्वासन दिले होते. लग्नास नकार दिल्याने रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तारातंड मैदानाजवळ दोघांमध्ये भांडण झाले. (हेही वाचा -Punjab Crime: पंजाबमध्ये काँग्रेस नेत्याची गोळ्या झाडून हत्या, खलिस्तानी दहशतवाद्याने घेतली जबाबदारी)
घनश्याम रायने तिला घरी नेण्यास नकार दिला तेव्हा महिलेने तिच्या पर्समधून ब्लेड काढले आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टवर अनेक वार केले. त्यामुळे त्याचा प्रायव्हेट पार्ट जखमी झाला. प्रियकरावर हल्ला केल्यानंतर महिलेने पोलिस स्टेशन गाठले. त्यांनी पोलीस स्टेशन प्रभारी यांना निवेदन देऊन न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे.
महिलेच्या फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी एफआयआर दाखल करून महिलेला कलम 164 अन्वये कोर्टात जबाब घेण्यासाठी आणि वैद्यकीय तपासणीसाठी गिरिडीहला नेले. पोलीस स्टेशन प्रभारी प्रदीप कुमार महतो यांनी सांगितले की, महिलेचा अर्ज प्राप्त झाला असून अर्जाच्या आधारे गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.