Bengaluru Suicide: नवीन कपडे घेऊन देण्यास आई-वडिलांचा नकार, वाढदिवसाच्या दिवशीच मुलीने घेतला गळफास
ही घटना कर्नाटकच्या (Karnataka) बंगळरू (Bengaluru) येथे घडली आहे.
नवीन कपडे घेऊन देण्यास आई-वडिलांनी नकार दिल्याने 16 वर्षीय मुलीने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना कर्नाटकच्या (Karnataka) बंगळरू (Bengaluru) येथे घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. मृत मुलीचे आई-वडील मजदूर आहेत. संध्याकाळी कामावरून घरी परतल्यावर मुलीला दरवाजा उघडण्यास सांगितले. मात्र, घरातून कोणताच प्रतिसाद न मिळल्याने त्यांनी दरवाजा तोडला. त्यावेळी त्यांची मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांना आढळली. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
घटनेनंतर कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, त्यांची मुलगी शाळा शिकत होती. पण, दहावीच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर तिने शिक्षण सोडले. आई-वडिल कामाला गेल्यानंतर ती एकटीच घरी राहायची. सोमवारी तिचा वाढदिवस होता. यासाठी ती आपल्या पालकांकडे नवीन कपड्यांची मागणी करत होती. परंतु, लॉकडाऊनमुळे आलेल्या आर्थिक संकटामुळे त्याच्या पालकांनी त्याला नवीन कपडे घेण्यास नकार दिला. त्यानंतर तिने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. हे देखील वाचा- Bihar Shocker: गांजासाठी 50 रुपये देण्यास नकार दिल्याने व्यक्तीने मित्राला भोकसले
मृत मुलीबद्दल असेही सांगितले जात आहे की, तिला लांबच्या एका नातेवाईकाशी लग्न करायचे होते. परंतु, दोन्ही कुटुंबाकडून त्यांच्या लग्नाला विरोध होत होता. ज्यामुळे ती नैराश्यात गेली होती, अशी माहिती मृत मुलीच्या कुटुंबातील एका सदस्याने पोलिसांना दिली आहे.
याशिवाय, उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात एका प्रेमी जोडप्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. दोघांची गावे आणि भावकीही वेगळी होती. ज्यामुळे नातेवाईकांकडून त्यांच्या लग्नाला विरोध केला जात होता. पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.