Geeta Press Trustee Baijnath Aggarwal Passes Away: गीता प्रेसचे विश्वस्त बैद्यनाथ अग्रवाल यांचे निधन; योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला शोक

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर येथील गीता प्रेसचे विश्वस्त बैजनाथ अग्रवाल (90) यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांनी त्यांचा मुलगा देवीदयाल अग्रवाल यांच्याशी बोलून त्यांचे सांत्वन केले.

Baijnath Aggarwal (PC - Twitter)

Geeta Press Trustee Baijnath Aggarwal Passes Away: गीता प्रेसचे विश्वस्त (Geeta Press Trustee) बैद्यनाथ अग्रवाल (Baijnath Aggarwal) यांचे निधन झाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर येथील गीता प्रेसचे विश्वस्त बैजनाथ अग्रवाल (90) यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांनी त्यांचा मुलगा देवीदयाल अग्रवाल यांच्याशी बोलून त्यांचे सांत्वन केले. गोरखपूर येथील हरिओम नगर येथील राहत्या घरी शुक्रवारी रात्री अडीचच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

शोकसंदेशात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, 'गेली 40 वर्षे गीता प्रेसचे विश्वस्त या नात्याने बैजनाथ यांचे जीवन सामाजिक भान आणि मानव कल्याणासाठी समर्पित होते. ते भगवंताचे निस्सीम भक्त होते. बैजनाथ यांच्या निधनाने समाजाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी कुटुंबीयांशी बोलून त्यांचे सांत्वन केले आहे. बैद्यनाथ अग्रवाल हे सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत. गीता प्रेसच्या माध्यमातून त्यांचा धार्मिक आणि सामाजिक सहभागही होता. (हेही वाचा - Breaking News: मुकेश अंबांनीना जीवे मारण्याची धमकीचा ईमेल, पोलिसात अज्ञाताविरुध्दात गुन्हा दाखल)

नुकतेच गीता प्रेसने आपली शताब्दी साजरी केली. भारत सरकारने गीता प्रेस गोरखपूरची 2021 च्या गांधी शांतता पुरस्कारासाठी निवड केली होती. तथापि, गीता प्रेस ट्रस्टने हा सन्मान स्वीकारला. परंतु पुरस्काराची एक कोटी रुपयांची रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. गीता प्रेसने विविध धार्मिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. गीता प्रेसने अवघ्या दीड वर्षात सुमारे 1.75 लाख रंगीत पुस्तकांची विक्री केली यावरून लोकांच्या पसंतीचा अंदाज लावता येतो.

गीता प्रेस व्यवस्थापन पुस्तकांबाबत नवनवीन प्रयोग करत असते. 2021 मध्ये गीता प्रेसने जपानमधून कलर प्रिंटिंग मशीन कोमोरी आयात केले. हे आतापर्यंतचे सर्वात आधुनिक कलर प्रिंटिंग मशीन आहे. हे यंत्र आल्यानंतर गीता प्रेसमध्ये आर्ट पेपरवर रंगीत पुस्तके प्रकाशित करण्याची प्रक्रिया सुरू झाली. गीता प्रेसने श्रीमद भागवत गीतेचे प्रकाशन एप्रिल 2021 मध्ये पहिल्यांदा केले.

लोकांना हे पुस्तक खूप आवडले. श्रीमद भागवत गीता पूर्वी सामान्य कागदावर काळ्या-पांढऱ्या रंगात छापली जायची. लोकांची पसंती लक्षात घेऊन गीता प्रेसने 2022 मध्ये दुर्गा सप्तशती आणि त्यानंतर सुंदरकांड प्रकाशित करण्यास सुरुवात केली.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement