Buxar Gangrape: बक्सरमध्ये मुलासोबत बँकेत जाणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार; लज्जास्पद कृत्यानंतर पीडितेसह मुलाला फेकलं नदीत, चिमुरड्याचा मृत्यू

आरोपींनी पीडित महिलेला आपल्या मुलासह बांधले आणि नदीत फेकून दिले. यात मुलाचा मृत्यू झाला आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

बिहारमधील (Bihar) बक्सरमध्ये (Buxar) आपल्या मुलासोबत बँकेत जाणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार (Gangrape) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी पीडित महिलेला आपल्या मुलासह बांधले आणि नदीत फेकून दिले. यात मुलाचा मृत्यू झाला आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

बिहारच्या बक्सरमधील या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. मुरार पोलिस ठाण्यातील ओझा बराव गावात बँकेत जाणाऱ्या महिलेचे तिच्या मुलासह अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिला आणि तिच्या मुलाला एकत्र बांधून नदीत फेकण्यात आले. (हेही वाचा - मुंबई: पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दोन महिलांना अश्लिल हावभाव केल्याप्रकरणी 27 वर्षीय व्यक्तीला अटक)

या घटनेसंदर्भात पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, माझी मुलगी आपल्या पाच वर्षाच्या मुलासह बँकेत गेली होती. मात्र, रात्री 11 नंतर तिचा मोबाईल बंद झाला. सकाळी माझी मुलगी आणि नातू नदीत बांधलेल्या अवस्थेत आढळले. या घटनेनंतर पीडिता वाचली असून तिचा मुलाचा मृत्यू झाला आहे. (वाचा - Rape In Mumbai: मुंबई येथे दहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार; आईच्या तक्रारीनंतर जन्मदात्या पित्याला अटक)

दरम्यान, यासंदर्भात बोलताना पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, काही लोकांनी तिला घेरले आणि त्यानंतर अपहरण करुन सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर महिलेला मुलासह बांधले आणि तिला नदीत फेकले. मुलीच्या आवाज ऐकून लोकांनी तिला वाचवण्यासाठी नदीत उडी मारली. त्यानंतर मुलीला नदीतून बाहेर काढण्यात आले. परंतु, यात पीडितेच्या मुलाचा मृत्यू झाला. सध्या या महिलेवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून इतर गुन्हेगाराचा तपास सुरू आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif