Ganderbal Terror Attack: गांदरबल दहशतवादी हल्ल्यात एक डॉक्टर आणि सहा कामगार ठार, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केली हळहळ
अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील गुंड भागात बोगदा प्रकल्पावर काम करणारे मजूर आणि इतर कर्मचारी संध्याकाळी उशिरा त्यांच्या छावणीत परतले तेव्हा अज्ञात दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता.
Ganderbal Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्गावरील बोगद्याच्या बांधकामाच्या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक डॉक्टर आणि सहा कामगार ठार झाले आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील गुंड भागात बोगदा प्रकल्पावर काम करणारे मजूर आणि इतर कर्मचारी संध्याकाळी उशिरा त्यांच्या छावणीत परतले तेव्हा अज्ञात दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी कामगारांच्या गटावर अंदाधुंद गोळीबार केला, ज्यात स्थानिक आणि बाहेरचे लोक होते. दहशतवाद्यांची संख्या किमान दोन असल्याचे मानले जात आहे. अधिका-यांनी सांगितले की, दोन कामगार जागीच ठार झाले तर इतर चार जखमी कामगार आणि एका डॉक्टरचा नंतर मृत्यू झाला. पाच जखमींवर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे. हे देखील वाचा: Key IPOs This Week: ह्युंदाई मोटर, लक्ष्य पॉवरटेक आणि फ्रेशारा एग्रो एक्सपोर्ट्स बाजारात पदार्पण करणार; जाणून घ्या या आठवड्यातील प्रमुख आयपीओ
काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक (IGP) व्हीके बिर्डी यांच्यासह वरिष्ठ सुरक्षा अधिकारी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यांनी 'X' वर लिहिले, "गांदरबल हल्ल्यातील मृतांची संख्या अंतिम नाही कारण स्थानिक आणि बिगर स्थानिक असे अनेक मजूर जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना SKIMS, श्रीनगरमध्ये दाखल केले जात असल्याने सांगण्यात येत आहे.
अब्दुल्ला यांनी या हल्ल्याचा निषेध केला, जो केंद्रशासित प्रदेशाचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर काही दिवसानंतर हा हल्ला झाला आहे. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनीही नागरिकांवरील या घृणास्पद दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला.
सिन्हा यांनी 'X' वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, "मी लोकांना आश्वासन देतो की, या घृणास्पद कृत्यामागे असलेल्यांना सोडले जाणार नाही. आम्ही जम्मू-काश्मीर पोलीस, लष्कर आणि सुरक्षा दलांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे.
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनीही या हल्ल्याचा निषेध केला.
"गांदरबलमधील दोन मजुरांवरील हिंसाचाराच्या या मूर्खपणाच्या कृत्याचा मी निःसंदिग्धपणे निषेध करतो," त्यांच्या कुटुंबीयांना मनापासून संवेदना, असे त्यांनी 'X' वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
पीपल्स कॉन्फरन्सचे नेते सज्जाद गनी लोन यांनी 'X' वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे, "...मी या घृणास्पद दहशतवादी कृत्याचा तीव्र निषेध करतो. हे वेडेपणाच्या सीमारेषे पलीकडचे कृत्य आहे. माझ्या संवेदना (पीडित) कुटुंबियांसोबत आहेत. गुन्हेगारांना शिक्षा मिळाली पाहिजे.”
जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तारिक हमीद कारा यांनी या हल्ल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आणि म्हटले की, अशा घटना केंद्रशासित प्रदेशातील वातावरण बिघडवतील. निरपराध मजुरांवर होणारे असे क्रूर हल्ले थांबवण्यासाठी सरकारने तातडीने कारवाई करावी, अशी विनंती त्यांनी केली.