Uttar Pradesh: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या चुलत भाऊ-वहिनीची गळा आवळून हत्या
उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) ग्रेटर नोएडाच्या (Greater Noida) अल्फा-2 सेक्टर येथे राहणाऱ्या नगेंद्र नाथ (वय, 70) आणि त्यांची पत्नी सुमन नाथ या दोघांचे त्यांच्या राहत्या घरी मृतदेह आढळून आले होते. या घटनेची माहिती होताच गौतमबुद्ध नगर पोलीस आयुक्तांसह सर्व उच्च अधिकारी घटनास्थळी दाखल झाले
उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) ग्रेटर नोएडाच्या (Greater Noida) अल्फा-2 सेक्टर येथे राहणाऱ्या नगेंद्र नाथ (वय, 70) आणि त्यांची पत्नी सुमन नाथ या दोघांचे त्यांच्या राहत्या घरी मृतदेह आढळून आले होते. या घटनेची माहिती होताच गौतमबुद्ध नगर पोलीस आयुक्तांसह सर्व उच्च अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस चौकशीत दोघांची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या दुहेरी हत्यानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. हत्यामागचे नेमके कारण काय? हे अद्याप स्पष्ट झाले नसून याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी कसून चौकशीला सुरुवात केली आहे. महत्वाचे म्हणजे, मृत व्यक्ती कमलनाथ ( Kamal Nath) यांचा चुलत भाऊ आणि वहिनी असल्याची माहिती समोर येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमन हा भारती योग संस्थानमध्ये योग प्रशिक्षक होत्या. त्या बर्याच काळापासून लोकांना योगाचे मोफत शिक्षण देत होत्या. मात्र, नरेद्र नाथ आणि त्यांची पत्नी सुमन यांचा त्यांच्या राहत्या घरात मृतदेह आढळल्यानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. नरेंद्र यांचा मृतदेह घराच्या बेसमेन्ट मध्ये सापडला. तर, सुमन यांचा मृतदेह त्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावरील एका खोलीत आढळून आला. महत्वाचे म्हणजे, नाथ दाम्पत्याच्या घरात कोणतीही फोर्स एन्ट्री झालेली नाही. यामुळे या हत्येत त्यांच्या जवळच्या व्यक्तीचा हात असू शकतो, असा संशय पोलिसांना आहे. हे देखील वाचा- Chhattisgarh: खळबळजनक! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करुन हत्या; वडिलांसह चार वर्षाच्या चिमुकलीलाही केले ठार
नाथ दाम्पत्याच्या घरात रात्री उशीरापर्यंत पार्टी सुरु असल्याचे पोलिसांच्या चौकशीतून समोर आले आहे. त्यांच्या दारूच्या बाटल्या आणि खाद्यपदार्थ आढळून आले आहे. तसेच घरातील सगळ्या वस्तू इकडे-तिकडे पडल्याचे दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, मृतक आणि आरोपीने सोबतच पार्टी केली आहे, असा संशय पोलिसांना आला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Feb 05, 2021 07:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

