Chhattisgarh: खळबळजनक! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करुन हत्या; वडिलांसह चार वर्षाच्या चिमुकलीलाही केले ठार

एका 16 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार (Gangrape) करून तिची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेची वाच्यता होऊ नये होऊ नये म्हणून आरोपींना पीडिताच्या वडिलांसह एका चार वर्षाच्या चिमुकलीलाही ठार केल्या समोर आले आहे.

Chhattisgarh: खळबळजनक! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करुन हत्या; वडिलांसह चार वर्षाच्या चिमुकलीलाही केले ठार
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

एका 16 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार (Gangrape) करून तिची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेची वाच्यता होऊ नये होऊ नये म्हणून आरोपींना पीडिताच्या वडिलांसह एका चार वर्षाच्या चिमुकलीलाही ठार केल्या समोर आले आहे. ही घटना छत्तीसगडमधील (Chhattisgarh) कोरबा जिल्ह्यातील (Korba) लेमरू पोलिस स्टेशन (Lemru Police Station) अंतर्गत गढुप्रोडा (Gadhuproda) गावाजवळ 29 जानेवारीला घडली आहे. याप्रकरणी लेमरू पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशात एकच खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे वडील जुलै 2020 पासून मुख्य आरोपी संतराम मांझवार (वय, 45) यांच्या घरी गुरे चारण्याचे काम करीत होता. दरम्यान, 29 जानेवारी संतराम मंझवार हा पीडत मुलगी आणि तिच्या वडिलांसह चार वर्षाच्या चिमुकलीला दुचाकीवरुन घरी सोडण्यासाठी चालला होता. मात्र, त्याने कोराई गावात गाडी थांबवली आणि मद्यप्राशन केले. यादरम्यान इतर आरोपीही त्या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर आरोपीने तिघांनाही आपल्यासोबत जंगलाने वेढलेल्या जवळच्या टेकडीवर नेले आणि मुलीवर बलात्कार केला. या घटनेची वाच्यता होऊ म्हणून आरोपीने तिघांची निघृण हत्या करून त्यांचे मृतदेह जंगलात फेकले. हे देखील वाचा- धक्कादायक! विनयभंग करुन महिलेला जबरदस्तीने पाजले अ‍ॅसिड, धारधार शस्त्राने पोटही फाडले, उत्तर प्रदेशमधील घटना

याप्रकरणी लेमरू पोलिसांनी मुख्य आरोपी संतराम मांझवार यांच्यासह अब्दुल जब्बार (वय, 29), अनिल कुमार सारथी (वय, 20), परदेशी राम पानिका (वय, 35), आनंद राम पानिका (वय, 25), उमाशंकर यादव (वय, 21), अशा सहा जणांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याविरोधात आयपीसी कलम 302, 376 (2) जी, आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Feb 04, 2021 10:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).