Fuel rate Today: सलग आठव्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलचे दरात घट नाहीच

इंधन दराच्या (Fuel rate) पुनरावृत्तीतील ठळकपणाचे कारण तेलाच्या उत्पादनावरील होणाऱ्या दरामुळे होत आहे.

पेट्रोल डिझेल दरवाढ (Photo Credits: Getty)

रविवारी चार महानगरांमध्ये (Metropolis) सलग आठव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and diesel) किंमती (Prices) वाढल्या आहेत. इंधन दराच्या (Fuel rate) पुनरावृत्तीतील ठळकपणाचे कारण तेलाच्या उत्पादनावरील होणाऱ्या दरामुळे होत आहे. अमेरिकेच्या वाढत्या मालमत्तेच्या घटनेचे पडसाद याचा परिणाम जागतिक पातळीवर होणाऱ्या तेलाच्या उत्पादनावर होत आहे. यामुळे भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol and diesel) दर वाढत चालले आहेत. काही आठवड्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रूडचे दर 77 डॉलर प्रती बॅरलच्या तुलनेत दहा टक्क्यांनी घटून  69 डॉलर प्रति बॅरलवर गेले आहेत. सध्या ब्रेंट क्रूड प्रति बॅरल  72 च्या वर आहे. तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमती कमी करण्यास थांबवले आहे. कारण तेलाच्या किमतींच्या हालचालीचा अभ्यास करण्यासाठी जास्त वेळ लागतो.

यापूर्वीच गेल्या काही दिवसांत क्रूडमध्ये वाढ झाली आहे. आणि यामुळे किंमतीत होणारी घसरण रोखू शकते. रविवारी दरात कोणताही बदल झाला नाही, तर राष्ट्रीय राजधानीत पेट्रोल प्रति लिटर 101.84 रुपये दराने विकले जात आहे. तर डिझेलची किंमत 89.87 रुपये प्रति लीटर आहे.  मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे पेट्रोल अनुक्रमे 107 रुपये, 102 रुपये आणि 100 रुपये प्रति लिटरला विकले जात आहे.

त्याचप्रमाणे दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे डिझेलची किंमत अनुक्रमे 89 रुपये, 97 रुपये, 94 रुपये आणि 93 रुपये प्रतिलिटर किंमत होती.  इंधनाच्या किंमती सलग 41 दिवस वाढत आहेत.  1 मेपासून 44 दिवसांवर किंमत वाढीचे सत्र कायम सुरू आहे. दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सामान्य माणूस हैराण झाला आहे. या वाढत्या किंमतीमुळे त्याच्या खिशाला मोठ्या प्रमाणात कात्री बसत आहे. मात्र अद्यापही इंढनवाढीचे सत्र सुरूच आहे. आता पुन्हा यात कधी घट होईल ही आशा प्रत्येक सामान्याला आहे. आधीच कोरोना  संकटामुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यात अजून मोठ्या प्रमाणात इंंधनवाढ सुरू आहे.