Floods in Assam and Manipur: आसाम, मणिपूरमध्ये पुराचा कहर! मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 48 जणांचा मृत्यू

पुरामुळे घरांचे नुकसान झाल्याने हजारो लोकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की, बुधवारी दोन राज्यांमध्ये पूरसंबंधित घटनांमध्ये एकूण मृतांची संख्या 48 वर पोहोचली आहे.

Floods in Assam and Manipur (PC - X/@Spearcorps)

Floods in Assam and Manipur: ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Rain) सुरू आहे. मणिपूर (Manipur) आणि आसाम (Assam) मध्ये पूरस्थिती गंभीर आहे. दोन्ही राज्यांमध्ये अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पुरामुळे घरांचे नुकसान झाल्याने हजारो लोकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की, बुधवारी दोन राज्यांमध्ये पूरसंबंधित घटनांमध्ये एकूण मृतांची संख्या 48 वर पोहोचली आहे.

आसाम आणि मणिपूरमध्ये मुसळधार पाऊस -

आसाम आणि मणिपूर या दोन्ही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून भारतीय हवामान विभागाने (IMD) या आठवड्यात सर्व ईशान्येकडील राज्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. लष्कर, आसाम रायफल्स, राज्य पोलीस, मणिपूर अग्निशमन सेवा, एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे कर्मचारी आणि स्थानिक स्वयंसेवकांनी पूरग्रस्त लोकांची सुटका करण्यासाठी तसेच पॅक केलेल्या पाण्याच्या बाटल्या आणि अन्नाची पाकिटे वाटण्यासाठी बोटींचा वापर केला. (हेही वाचा -Air Pollution in India: वाढते वायू प्रदूषण भारतासाठी आव्हान; देशातील 10 शहरांमध्ये हवेची गुणवत्ता घसरल्याने दरवर्षी सुमारे 33,000 मृत्यू)

आसाममध्ये 46 जणांचा मृत्यू -

आसाममधील 46 आणि मणिपूरमधील दोन अशा दोन्ही राज्यांमध्ये पुरामुळे एकूण 48 मृत्यू झाले आहेत. बुधवारी आसाममध्ये पुराच्या पाण्यात बुडून आठ जणांचा मृत्यू झाला, तर मणिपूरमध्ये दोन जणांचा बुडून मृत्यू झाला. आसाममधील एकूण पूरस्थिती अजूनही गंभीर आहे कारण पुराच्या दुसऱ्या लाटेमुळे 29 जिल्ह्यांतील 16.25 लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. दरम्यान, मणिपूरमधील पूरग्रस्त भागातून 2000 हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. (हेही वाचा - Mumbai Weather Forecast For Tomorrow: देशात उद्याचे हवमान कसे? जाणून घ्या 4 जुलैचा अंदाज)

पहा व्हिडिओ - 

दरम्यान, 105 महसुली विभागांतर्गत 2800 गावे अजूनही पाण्यात बुडाली असून 39451.51 हेक्टर पीक क्षेत्र पुराच्या पाण्यात बुडाले आहे. आसाममध्ये, 3.86 लाखांहून अधिक लोक 24 पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने स्थापन केलेल्या 515 मदत छावण्या आणि वितरण केंद्रांमध्ये आश्रय घेत आहेत. गेल्या 24 तासांत पुराच्या पाण्यामुळे मणिपूर आणि आसाम या दोन्ही ठिकाणी शेकडो रस्ते, डझनभर पूल आणि हजारो घरांचे नुकसान झाले आहे. या आठवड्यात ब्रह्मपुत्रा नदी आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्याच्या पातळीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. ज्यामुळे आजूबाजूच्या

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now