UP Yamuna Expressway Accident: उत्तर प्रदेशातील यमुना द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, 5 जणांचा होरपळून मृत्यू
उत्तर प्रदेशमधील यमुना द्रुतगती मार्गावर मंगळवारी पहाटे 5 जणांचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला.
UP Yamuna Expressway Accident: उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) यमुना द्रुतगती मार्गावर (Yamuna Expressway) मंगळवारी पहाटे 5 जणांचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. लखनऊच्या दिशेने जाणाऱ्या एका गाडीला उलट दिशेने येणाऱ्या कंटेनरला धडक दिली. त्यामुळे गाडीला भीषण आग लागली. या अपघातात कारमधील 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला. कारमधील लोकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी अपघातस्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळवलं. या अपघातानंतर कंटेनरचा चालक घटनास्थळावरून फरार झाला. मिळालेल्या माहितीनुसार, आग्राच्या खंदौली भागात एक्सप्रेसवेवर हा अपघात झाला. कारला धडक लागताच नागालँडचा नंबर असलेल्या कंटेनरला आग लागली. हा अपघात इतका भीषण होता की, कारमधील लोकांना बाहेर येण्याची संधीदेखील मिळाली नाही. गाडीतील लोकांनी मदत मागितली. मात्र, पोलिस व अग्निशमन दलाला घटनास्थळी येईपर्यंत बराच उशीर झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघातात मृत्यू झालेल्या पाच जणांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. (हेही वाचा - Baba Ka Dhaba चे मालक Kanta Prasad यांनी दिल्लीमध्ये सुरू केलं नवीन रेस्टॉरंट; पहा फोटोज)
दरम्यान, कंटेनरच्या चुकीच्या दिशेने व अंधारामुळे कार कंटेनरच्या डिझेल टँकला धडकली. त्यामुळे लागलेल्या आगीत गाडीतील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सुमारे एक तासाने पोलिस व अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचल्याचा प्रत्यक्षदर्शींनी आरोप केला आहे. तोपर्यंत सर्व प्रवाशांचा कारमध्ये होरपळून मृत्यू झाला होता. यात एका मुलाचादेखील समावेश होता.
डीएम प्रभु एन सिंह (Prabhu N Singh) यांनी सांगितलं की, "आम्ही पीडितांचे नातेवाईक शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत. ट्रकचालक घटनास्थळापासून बेपत्ता झाला आहे." त्याचवेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या वेदनादायक रस्ता अपघाताची दखल घेऊन दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचण्यासाठी आणि पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.