Modi Cabinet 3.0 Meeting: मोदी मंत्रिमंडळाची पहिली बैठक सुरू; लवकरचं खातेवाटप होण्याची शक्यता
अधिकाऱ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, पंतप्रधान कार्यालय हा सेवेचा पाया आणि लोकांचा पीएमओ बनण्याचा त्यांचा सुरुवातीपासूनच प्रयत्न आहे.
Modi Cabinet 3.0 Meeting: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नव्या मंत्रिमंडळाची (New Cabinet) पहिली बैठक सुरू झाली आहे. लोककल्याण मार्गावरील पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही बैठक होत आहे. या बैठकीत नव्या मंत्रिमंडळात शपथ घेणारे मंत्री उपस्थित आहेत. पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी सोमवारपासून कामाला लागले आहेत. त्यांनी पदभार स्वीकारताच, त्यांनी पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) च्या 17 व्या हप्त्याशी संबंधित फाइलवर सही केली. यानंतर त्यांनी पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांची भेट घेतली. (हेही वाचा -Narendra Modi Takes Oath as PM For Third Term: देश-विदेशातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधान पदाची शपथ (Video))
कॅबिनेट बैठकीपूर्वी पीएम मोदींनी पीएमओ अधिकाऱ्यांची भेट घेतली. अधिकाऱ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, पंतप्रधान कार्यालय हा सेवेचा पाया आणि लोकांचा पीएमओ बनण्याचा त्यांचा सुरुवातीपासूनच प्रयत्न आहे. रविवारी मोदी मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर मंत्रिपदांच्या विभाजनाबाबत चर्चा सुरू झाली होती. आज होणाऱ्या पहिल्या बैठकीत मंत्र्यांना खातेवाटप केले जाऊ शकते. (हेही वाचा - PM Modi Cabinet 3.0: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात कोण किती शिकलेलं? काही मंत्री 12वी पास तर काहींनीचं पूर्ण केली आहे पदव्युत्तर पदवी, वाचा सविस्तर)
सध्या सुरू असलेल्या बैठकीला राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारची पहिली कॅबिनेट बैठक सोमवारी झाली. बैठकीत पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 3 कोटी नवीन घरे बांधण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल 71 मंत्र्यांसह नवीन आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी शपथ घेतली. पंतप्रधानांसह 72 मंत्र्यांपैकी 30 कॅबिनेट मंत्री, पाच स्वतंत्र प्रभार आणि 36 राज्यमंत्री बनले आहेत. मात्र, अद्याप मंत्र्यांना खात्यांचे वाटप झालेले नाही. (हेही वाचा - PM Kisan Nidhi Funds: तिसऱ्या टर्ममधील पंतप्रधानांचा पहिला आदेश; पीएम किसान निधीच्या आदेशावर केली स्वाक्षरी)
दरम्यान, आपल्या तिसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीसोबतच पंतप्रधान मोदींनी देशातील अन्नपुरवठादारांना मोठी भेट दिली आहे. 'किसान सन्मान निधी'चा 17वा भाग सोमवारी प्रदर्शित झाला. या हप्त्याअंतर्गत केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी 20 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.