Firecrackers Ban In India: यंदा दिवाळीत फटाके फोडण्यासंदर्भात नियमावली? सर्वोच्च न्यायालयाने दिला आदेश
दिल्लीत नव्हे तर या राज्यात देखील निर्बंध लावण्यात येणार आहे.d
Firecrackers Ban In India: यंदा दिवाळीत फटाके फोडण्यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात दिल्लीसाठी काही नियम लादले होते परंतु यात आणखीन भर पडल्याचा माध्यमांना माहिती मिळली आहे. फक्त दिल्लीच नव्हे तर देशातील सर्व राज्यात ही नियमावली असणार आहे. वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आहे. वाढत्या प्रदुषणामुळे दिल्ली नागरिकांना त्रास होत असल्याने फटाके फोडण्यासंदर्भात निर्णय घेतला.
सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या आदेशानंतर देशातील सर्व राज्यात दिवाळीत फटाके फोडण्याचे नियम असतील. सर्वोच्च न्यायालयने सांगितल्या प्रमाणे फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात यावी की नाही यावर राज्यसरकारने निर्णय घ्यायचा आहे. वाढत्या ध्वनी आणि वायू प्रदुषणाला नियंत्रित आणण्यासाठी राज्य सरकारने पाऊले उचलावी. न्यायमूर्ती एएस बोपण्णा आणि न्यायमूर्ती एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठासमोर फटाक्यांच्या विक्री, खरेदी आणि वापरावर बंदी घालण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी सुरू होती. या याचिकाकर्त्याने राजस्थान राज्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून मागील आदेशांची थेट अंमलबजावणी करण्याचे आदेश मागण्यासाठी याचिका दाखल केली होती.
दिवाळीत फटाके फोडण्यासंदर्भात अनेकांनाच प्रश्न पडला आहे. त्यामुळे राज्य सरकार काय नियम देईल यावर सर्वांना संभ्रम पडला आहे. ऐन दिवाळीत फटाक्यांवर लावलेल्या निर्बंधामुळे काहींनी संपात व्यक्त केला आहे. आता राज्य सरकार काय निर्णय घेईल याची चर्चा होत आहे.