Fire At Transport Warehouse In Gujarat: गुजरातच्या बिलीमोरा भागातील ट्रान्सपोर्ट वेअरहाऊसला आग; 3 जणांचा मृत्यू, तीन जखमी

या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. जखमींना वलसाडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.

Fire At Transport Warehouse In Gujarat (फोटो सौजन्य - ANI)

Fire At Transport Warehouse In Gujarat: गुजरात (Gujarat) मधील नवसारी (Navsari) येथील एका ट्रान्सपोर्ट गोदामाला भीषण आग (Fire at Transport Godown) लागल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आग विझवण्याचे काम सुरू केले. नवसारी डीएसपी भगीरथ सिंह गोहिल यांनी सांगितले की, ट्रकमधून केमिकल बॅरल उतरवताना हा अपघात झाला. बॅरल अनलोड करताना झालेल्या अपघातात आग लागली. या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. जखमींना वलसाडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.

ट्रकच्या बॅरलमधून केमिकलची गळती झाल्यामुळे आग लागली आणि काही वेळातच आग संपूर्ण गोदामात पसरली. आग वेगाने पसरल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आणि अन्य तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले. घटनेनंतर एक कर्मचारी बेपत्ता झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. (हेही वाचा - Diwali Tragedy in Pune: फटाक्यांच्या धुरात दुचाकींची समोरासमोर धडक, 4 जखमी अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल (Watch Video))

गुजरातमध्ये ट्रान्सपोर्ट वेअरहाऊसला आग, पहा व्हिडिओ - 

आग आटोक्यात आणण्यासाठी जवळपासच्या भागातून पाच अग्निशमन इंजिन तैनात करण्यात आले होते. यावरून आगीची तीव्रता अधोरेखित होते. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आणण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य आणि घटनेनंतर सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक पावले उचलून, पुढील कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी गोदामामध्ये कूलिंग ऑपरेशन्स सुरू करण्यात आले.