Trichy Man Performs Bike Stunt: फिल्मी स्टाईल स्टंट, पुलावर असलेल्या डिव्हायडरवर चालवली बाईक, तमिळनाडू येथील घटना

प्रसिध्द होण्यासाठी तरुणाई काही करतात. कधी पुलावर नाचतात, तर कधी वाहनांवर चढून स्टंट करतात आणि व्हिडिओ शूट करतात. तामिळनाडूतील एका तरुणाने हद्दच पार केली आहे.

Trichy Man Performs Bike Stunt: फिल्मी स्टाईल स्टंट, पुलावर असलेल्या डिव्हायडरवर चालवली बाईक, तमिळनाडू येथील घटना
Trichy Man Performs Bike Stunt PC TWITTER

Trichy Man Performs Bike Stunt: प्रसिध्द होण्यासाठी तरुणाई काही करतात. कधी पुलावर नाचतात, तर कधी वाहनांवर चढून स्टंट करतात आणि व्हिडिओ शूट करतात. तामिळनाडूतील एका तरुणाने हद्दच पार केली आहे. त्रिचीमधील कोल्लीडम नदीच्या पुलावर असलेल्या दुभाजकावर फिल्मी स्टाईलने दुचाकी चालवली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दुभाजकावर दुचाकी चालवत असल्याने रस्त्यावर सर्व जण आवाक झाले. व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.  (हेही वाचा- भरदिवसा ठो,ठो,ठो...; किरकोळ वादातून डीजे संदीप उर्फ सँडीची गोळ्या झाडून हत्या )

मिळालेल्या माहितीनुसार, त्रिचीमधील कोल्लीडम नदीच्या पुलावर एक तरुण बाईक स्टंट करत असताना दिसला. एकाने त्याचा व्हिडिओ शूट केला आहे. तो व्हिडिओ X च्या अकाऊंटवर पोस्ट केला आहे. स्टंट करणाऱ्या तरुणाने रस्त्यावरच्या सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले आहे.  व्हिडिओ व्हायरल होताच, नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी त्याचा कृत्याचा निषेध केला आहे. तर काहींनी  कारवाईची मागणी केली आहे. एका युजर्सने लिहले आहे की, कृपया या जोकरला अटक करा आणि त्याचे वाहन जप्त करा. जेणेकरून याची पुनरावृत्ती होणार नाही. ज्यामुळे सार्वजनिक रस्त्यावर अपघात होणार नाही.

ही घटना २३ मे रोजी घडली आहे. रस्त्यावर निर्बंध असताना देखील तरुणाने असे कृत्य केले आहे. त्यामुळे अनेकांनी प्रशासनावर प्रश्न उभा केला आहे. तरुणावर अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचे वृत्त आहे. व्हिडिओत असे दिसून आले आहे की, तरुण मंडळी मिरवणूक काढत आहे. त्यावेळी हा स्टंट केल्याचे दिसते.

(The above story first appeared on LatestLY on May 28, 2024 10:31 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).