Rahul Gandhi On PM Narendra Modi: पेट्रोलच्या टाक्या लवकर भरून घ्या, मोदी सरकारची 'इलेक्शन' ऑफर संपणार, राहुल गांधीचा पंतप्रधानांवर निशाणा

विधानसभा निवडणुकीनंतर (Assembly Election 2022) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याच्या शक्यतेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शनिवारी मोदी सरकारवर (Central Govt) निशाणा साधला आहे.

Rahul Gandhi & PM Narenrda Modi (Photo Credit - FB/PBI)

सध्या रशिया आणि युक्रेनमधील युद्ध (Russia Ukraine War) जगभरात चर्चेचा विषय आहे. हजारो युक्रेनियन नागरिकांना या युद्धाचा फटका बसला असतानाच त्याचा परिणाम आता अनेक देशावरही दिसुन येणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर (Assembly Election 2022) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याच्या शक्यतेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शनिवारी मोदी सरकारवर (Central Govt) निशाणा साधला आहे. त्यांनी लोकांना आव्हान केले आहे की तुम्ही लवकरात लवकर पेट्रोलच्या टाक्या भरुन घ्या, कारण “इलेक्शन ऑफर” लवकरच संपणार आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. प्रत्यक्षात पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार शनिवारी संपला. राहुल गांधी म्हणाले, 'पेट्रोलच्या टाक्या लवकरात लवकर भरून घ्या. मोदी सरकारची 'इलेक्शन' ऑफर संपणार आहे.

Tweet

काँग्रेसचा सरकारवर आरोप

गेल्या अनेक दिवसांपासून भाजप सरकार निवडणुकीच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणारी वाढ थांबवते आणि निवडणुका संपल्या की लगेचच दर वाढवतात असा आरोप काँग्रेस सातत्याने करत आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा सध्याचा टप्पा 10 फेब्रुवारीपासून सुरू झाला असून तो 7 मार्चला संपणार आहे. 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. (हे ही वाचा Russia Ukraine War: युक्रेनच्या सुमीमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांबद्दल भारत चिंतेत, परराष्ट्र मंत्रालयाचा अनावश्यक जोखीम टाळण्याचा सल्ला)

पुढील आठवड्यापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढू शकतात

पुढील आठवड्याच्या अखेरीस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 100 डॉलरच्या वर गेल्या आहेत. त्यामुळे तेल कंपन्यांना सामान्य मार्जिन गाठण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 9 रुपयांनी वाढ करण्याची गरज आहे. रशियाकडून तेल पुरवठा खंडित होण्याच्या भीतीने आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती 2014 नंतर प्रथमच प्रति बॅरल 110 वर पोहचतील