Delhi Shocker: क्षुल्लक कारणावरून आईला मारहाण केल्याप्रकरणी रागाच्याभरात अल्पवयीन मुलाकडून वडिलांची हत्या

सध्या पोलिस प्रकरणाचा तपास करत आहेत. मुलाने वडिलांच्या डोक्यावर प्लास्टिकच्या पाईपने हल्ला केल्याने या घटनेत वडिलांचा मृत्यू झाला.

Photo Credit- X

Delhi Shocker: रागाच्या भरात वडिलांची हत्या(Son Killed Father) केल्याच्या आरोपाखाली एका १६ वर्षीय मुलाला रविवारी ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्लीच्या रोहिणी येथे ही घटना घडली आहे. शनिवारी वडिल दारूच्या नशेत घरी आले. त्यांनी पत्नी आणि मुलाला मारहाण आणि शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. दारूच्या नशेत काहीच कारण नसताना वडिल आईला मारहाण करत असल्याचे पाहून मुलाचा संताप झाला. त्याने घरात असलेल्या पाईपने वडिलांच्या डोक्यावर हल्ला केला. हल्ला सहन न झाल्याने वडिलांचा जागीच मृत्यू झाला. (Delhi Shocker: दिल्लीतील डीबीजी रोड परिसरात अंगावर एसी पडल्याने तरुणाचा मृत्यू, दुसरा जखमी (Watch Video)

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 'रविवारी सकाळी 10.58 वाजता अमन विगार पोलीस स्टेशनमध्ये एका व्यक्तीच्या हत्येबाबत फोन आला. त्या व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात ठेवण्यात आला आहे', असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी पुढे माहिती दिली की, प्राथमिक चौकशीत ठार झालेला व्यक्ती दारूच्या नशेत क्षुल्लक कारणावरून पत्नी आणि मुलांना मारहाण करत असे. (Delhi Shocker: दिल्लीच्या प्रेम नगरमध्ये घराला आग लागून एकाच कुटुंबातील ४ जणांचा गुदमरून मृत्यू)

रविवारीही तसाच प्रकार घडला. त्यावर प्रतिक्रीया देताना मुलाने वडिलांवर हल्ला केला. ज्यात वडिलांचा मृत्यू झाला. पोलिसांनी अमन विहार पोलिस ठाण्यात संबंधित कलमांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.