Fatehpur DM Indumati Video: फतेहपूरच्या डीएम इंदुमती संतापल्या, धक्का लागळ्यावर तरुणाला लोकांसमोर मारली कानाखाली,व्हिडिओ व्हायरल

उत्तर प्रदेशातील फतेहपूरचे जिल्हा दंडाधिकारी इंदुमती यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इंदुमती यांनी ड्युडा कार्यालय आणि जिल्ह्यातील उपनिबंधक कार्यालयात अचानक तपासणीसाठी भेट दिली.

Photo Credit: X

Fatehpur DM Indumati Video: उत्तर प्रदेशातील फतेहपूरचे जिल्हा दंडाधिकारी इंदुमती यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इंदुमती यांनी ड्युडा कार्यालय आणि जिल्ह्यातील उपनिबंधक कार्यालयात अचानक तपासणीसाठी भेट दिली. डीएम इंदुमती यांच्या अचानक आगमनानंतर भीती निर्माण झाल्याने लोकांची इकडे-तिकडे धावपळ सुरू झाली. दरम्यान, तेथे काही कामानिमित्त आलेला एक व्यक्ती निघून जाण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान त्याची टक्कर डीएम इंदुमती यांच्याशी झाली. पुढे काय झाले, डीएम इंदुमती संतापल्या आणि त्यांनी त्या व्यक्तीला लोकांसमोर कानाखाली मारली.कानाखाली मारण्यासोबतच डीएम इंदुमती त्या व्यक्तीला दोन गोष्टी देखील सुनावल्या. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

डीएम इंदुमती त्या व्यक्तीला विचारत आहे की तू इथे का आला आहेस, तर ती व्यक्ती म्हणते की ती कामासाठी आली होतो, तेव्हा डीएम पुन्हा विचारतात की तुझे इथे काय काम आहे. दरम्यान, घाबरलेल्या व्यक्तीने डीएम इंदुमती यांची माफी मागायला सुरुवात केली. म्हणून त्यांनी त्याला निंदक म्हटले आणि सांगितले की त्याला इथे बसवा.हेही वाचा: UP shocker: उत्तर प्रदेशातील खळबळजनक घटना, मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न, रुग्णालयात उपचार सुरु

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटनाएक दिवस आधीची म्हणजेच सोमवारची आहे. कानाखाली मारल्यानंतर डीएम इंदुमती व्यक्तीला दोन गोष्टी देखील रंगत सूनवल्या. त्याचवेळी कोणीतरी मोबाईलमधून हा सर्व व्हिडिओ रेकॉर्ड केला. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता त्या व्यक्तीला धमकावन्यासाठी आणि मारहाण केली या कारीता डीएम इंदुमती वर कारवाई होते की नाही, हे पाहण्या सारखे असेल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement