Uttarakhand Road Accident: पिथौरागढमध्ये भीषण अपघात; बोलेरो 600 मीटर खोल दरीत कोसळली, 9 ठार, दोन जखमी

वाहनातील दहापैकी नऊ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Accident (PC - File Photo)

Uttarakhand Road Accident: उत्तराखंड (Uttarakhand)मधील पिथौरागढ (Pithoragarh) मध्ये एक वेदनादायक दुर्घटना घडली आहे. पिथौरागढ जिल्ह्यातील मुनसियारी ब्लॉकमधील बागेश्वरमधील सामापासून होकरा मंदिराकडे जाणारी जीप रस्त्यापासून पलटी होऊन रामगंगा नदीत पडली. वाहनातील दहापैकी नऊ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

अपघाताची माहिती तेथून जाणाऱ्या इतर वाहनचालकांनी दिली. येथून जाणाऱ्या इतर वाहनचालकांच्या माहितीवरून नाचणी पोलीस ठाण्याचे पोलीस, तेजम येथील महसूल आणि आपत्ती निवारण पथके घटनास्थळी पोहोचत आहेत. घटनास्थळ हे अतिशय दुर्गम भाग आहे. जीप 600 मीटरपेक्षा जास्त खोल दरीत कोसळत नदीत पडली. खंदकाच्या मध्यभागी लोकांचे मृतदेह दिसत आहेत. (हेही वाचा- Delhi Crime: दिल्लीच्या एरोसिटी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये तब्बल 2 वर्षे राहिला; 58 लाखाचे बिल न भरता पसार झाला, गुन्हा दाखल)

खोयामचे प्रमुख हीरा सिंग मेहता यांनी सांगितलं की, काल रात्री मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे नाला रस्त्यावर वाहू लागला आणि रस्ता खचला. रस्ता जीवघेणा बनला आहे. ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे त्याच ठिकाणी एवढा मोठा अपघात झाला आहे. सर्व ग्रामस्थ बचावकार्य करत आहेत.

आमदार हरीश धामी यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ होक्रा येथे पोहोचून बचावकार्याला गती देण्यास सांगितले आहे. अपघातासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलून मृतांच्या कुटुंबीयांना योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या भीषण अपघाताबद्दल आमदार हरीश धामी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif