Vehicle Rolls Down Cliff in Anantnag: जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये भीषण अपघात; कार कड्यावरून कोसळल्याने 5 मुलांसह 8 जणांचा मृत्यू
अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासही सुरू करण्यात आला आहे.
Vehicle Rolls Down Cliff in Anantnag: जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) मधील अनंतनाग जिल्ह्यात (Anantnag District) भीषण रस्ता अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. रस्ता अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पाच मुलांचाही समावेश आहे. हा अपघात दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागच्या डाकसुम भागात घडला. कारमधून प्रवास करणाऱ्या सर्वांना या अपघात आपला जीव गमवावा लागला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोंदणी क्रमांक JK03H9017 असलेले सुमो वाहन जम्मू भागातील किश्तवाड येथून येत होते. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार डॅक्समजवळील दरीत कोसळली. या अपघातात 5 मुले, दोन महिला आणि एका पुरुष पोलिस कर्मचाऱ्यासह 8 जणांचा मृत्यू झाला. (हेही वाचा -Freight Train Cars Derailed At Boisar: बोईसर मध्ये मालवाहू गाडीचे डब्बे घसरले, वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला; पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत)
अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासही सुरू करण्यात आला आहे. या अपघाताबाबत अधिक माहिती देताना पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, किश्तवार-अनंतनाग रस्त्यावरील आराशन ठिकाणी पोलीस कर्मचारी इम्तियाज अहमद आपल्या कुटुंबासह कारमधून जात असताना त्यांचा अपघात झाला. (हेही वाचा - Horrific Road Accident: विजयवाडाहून चेन्नईला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात, चालकाचा मृत्यू, तर 10 प्रवासी गंभीर जखमी)
चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार दरीत पडली. मृत इम्तियाज हे किश्तवाड येथून मडवा किश्तवाड येथील आपल्या घरी येत होते. या अपघातानंतर इम्तियाज यांच्या गावात शोककळा पसरली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)