Kisan Credit Card: आता कर्जाची चिंता होणार दुर, शेतकरी एसबीआयमार्फत किसान क्रेडिट कार्डसाठी करु शकतात अर्ज

हे कार्ड राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने तयार केले आहे. किसान क्रेडिट कार्ड आता सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेशी जोडले आहे.

Home | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

केंद्र सरकार (Central Government) शेतकऱ्यांना (Farmer) मदत करण्यासाठी अनेक योजना (Scheme) राबवते. त्यापैकी एक म्हणजे किसान क्रेडिट कार्ड (KCC). या कार्डद्वारे सरकार शेतकऱ्यांना अल्प कालावधीसाठी कर्ज देते. ही योजना सरकारने 1998 मध्ये सुरू केली होती, ज्यामध्ये शेतकऱ्यांना अल्प मुदतीचे कर्ज दिले जाते. हे कार्ड राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने तयार केले आहे. किसान क्रेडिट कार्ड आता सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेशी जोडले आहे.  या कार्डद्वारे शेतकऱ्यांना अत्यंत कमी व्याजदरात कर्ज मिळते. या कार्डद्वारे शेतकऱ्यांना 4 टक्के व्याजदराने 3 लाखांपर्यंतचे कर्ज (Loan) दिले जाते. यासोबतच पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांना KCC साठी अर्ज करणे देखील खूप सोपे झाले आहे.

किसान क्रेडिट कार्डचा लाभ घेण्यासाठी, तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया मधून देखील अर्ज करू शकता. एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी ही खास सुविधा सुरू केली आहे. केसीसी रिव्ह्यूची सुविधा देऊन शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी हे एक मोठे पाऊल असल्याची माहिती बँकेने दिली. आता केसीसीसाठी शेतकऱ्यांना बँकेत येण्याची गरज नाही, असेही बँकेने सांगितले. ते घरबसल्या SBI YONO अॅप डाउनलोड करून KCC (KCC Applying Process) साठी अर्ज करू शकतात. हेही वाचा 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होऊ शकते 20,484 रुपयांनी वाढ, पाहा संपूर्ण कॅलक्युलेशन

KCC तयार करण्यासाठी, तुम्ही प्रथम SBI YONO अॅप डाउनलोड करा. या लॉगिननंतर https://www.sbiyno.sbi/index.html. यानंतर तुम्ही YONO Agriculture या पर्यायावर जा. त्यानंतर तुम्ही अकाउंट ऑप्शनवर जा. नंतर KCC पुनरावलोकन विभाग निवडा. त्यानंतर तुम्ही Apply वर क्लिक करा.