Uttar Pradesh Crime: जातीवरून कमेंट केल्याने प्रसिध्द Youtuber ला बेदम मारहाण, चार जणांना अटक (Watch Video)

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा पश्चिम येथे एका प्रसिध्द युट्यूबरला काही तरुणांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.नहल्लेखोरांनी मारहाण केलायाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

youtuber avinash rajput PC TW

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा पश्चिम येथे एका प्रसिध्द युट्यूबरला काही तरुणांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हल्लेखोरांनी मारहाण केलायाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अविनाश राजपूत असं हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. व्हिडिओच्या शेवटी त्याने हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याचे विनंती केली. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली. (हेही वाचा- ठाण्यातील बेकायदेशीर पब-बार तसेच अमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर महापालिकेची कारवाई; अवैध बांधकामांवर फिरवला गेला बुलडोझर)

मिळालेल्या माहितीनुसार, अविनाशने सांगितले की, तो त्याच्या बहिणीला भेटण्यासाठी नोएडा येथे गेला होता. गौर सिटी मॉलमध्ये गेला. तेथे सात ते आठ हल्लेखोरांनी त्याच्यावर आणि त्याच्यावर मित्रावर हल्ला केला. हल्लेखोरांनी अविनाशला बेदम मारहाण केली. हल्ल्यात आरोपीने अविनाशच्या मित्राच्या डोक्याला जब्बर मारहाण केली. मारहाणीत त्याच्या मित्र गंभीर जखमी झाला.  जखमीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपींनी अविनाश याच्या गाडीची तोडफोड केली आणि त्याच्या मोबाईल फोन फेकला.

या घटनेनंतर अविनाशने सोशल मीडियावर मारहाणीचा व्हिडिओ शेअर करत आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली. या घटनेनंतर बिसरख पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केले आहे. जखमीचा रुग्णालयात अद्याप उपचार सुरु आहे. चारही आरोपी सर्फाबाद येथील गावाचे रहिवासी आहे. अविनाशने एका व्हिडिओत जातीवरुन कंमेट केल्यामुळे त्याला मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. राहुल, मुकेश, विशन आणि विनीत अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.