WPI Inflation September 2023: दिलासादायक! महागाईत घट; सप्टेंबरमध्ये -0.26 टक्क्यांवर पोहोचला महागाईचा दर

सप्टेंबरमध्ये महागाईचा दर नीचांकी पातळीवर पोहोचण्याचे कारण म्हणजे रासायनिक उत्पादने, खनिज तेल, कापड, मूलभूत धातू आणि खाद्यपदार्थांच्या किमती या महिन्यात घसरल्या आहेत. गेल्या वर्षी याच महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये हे पदार्थ खूपच महागले होते.

WPI Inflation September 2023: दिलासादायक! महागाईत घट; सप्टेंबरमध्ये -0.26 टक्क्यांवर पोहोचला महागाईचा दर
WPI Inflation (Pic Credit: IANS)

WPI Inflation September 2023: सर्वसामान्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये महागाईत घट झाली आहे. सप्टेंबरमध्ये महागाई (Inflation) चा दर -0.26 टक्के होता. या वर्षी ऑगस्टमध्ये तो -0.52 टक्के होता. सप्टेंबरमध्ये महागाईचा दर (Inflation Rate) नीचांकी पातळीवर पोहोचण्याचे कारण म्हणजे रासायनिक उत्पादने, खनिज तेल, कापड, मूलभूत धातू आणि खाद्यपदार्थांच्या किमती या महिन्यात घसरल्या आहेत. गेल्या वर्षी याच महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये हे पदार्थ खूपच महागले होते.

यासोबतच खाद्यपदार्थांची महागाई सप्टेंबरमध्ये 3.35 टक्क्यांपर्यंत घसरली, जी ऑगस्टमध्ये 10.60 टक्के होती. सलग 6 महिने WPI डेटामध्ये नकारात्मक ट्रेंड दिसत आहे. जुलैमध्ये एकूण चलनवाढीचा दर -1.36 टक्के होता. (हेही वाचा -IB Recruitment 2023: इंटेलिजंस ब्युरोमध्ये 677 जागांवर नोकरीची संधी; mha.gov.in वर करा अर्ज)

महागाई दर का कमी होण्याचे कारण -

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर 2023 मध्ये महागाई दरात घट झाली. याचं कारण, रासायनिक उत्पादने, खनिज तेल, कापड, मूलभूत धातू आणि खाद्यपदार्थांच्या किमतीत घट हे आहे.

या वस्तूंच्या किमतीत घट -

ऑगस्टमधील -6.03 टक्क्यांच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये इंधन आणि उर्जा बास्केटमधील महागाई -3.35 टक्के होती. त्याच वेळी, उत्पादित उत्पादनांचा महागाई दर -1.34 टक्के होता, तर ऑगस्टमध्ये तो -2.37 टक्के होता. गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की वार्षिक किरकोळ किंवा ग्राहक किंमत महागाई सप्टेंबरमध्ये 5.02 टक्के होती, जी तीन महिन्यांतील नीचांकी आहे.

(The above story first appeared on LatestLY on Oct 16, 2023 02:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).