ISRO GSLV F-10: इस्रोला GSLV F-10 उपग्रह प्रक्षेपित करण्यात अपयश, तिसऱ्या टप्प्यात गेल्यावर आला तांत्रिक अडथळा
हा उपग्रह जिओस्टेशनरी कक्षेत ठेवला जाणार होता.
इस्रोने (ISRO) आज सकाळी 5.43 वाजता GSLV F-10 द्वारे दुसऱ्या प्रक्षेपण पॅडवरून आंध्रप्रदेशातील (Andhra Pradesh) श्रीहरीकोटा (Sriharikota) येथून पृथ्वी निरीक्षण उपग्रह (Satellite) प्रक्षेपित केला आहे. जीएसएलव्ही अर्थात भू-सिंक्रोनस उपग्रह प्रक्षेपण वाहन, जे पृथ्वी निरीक्षण उपग्रह ईओएस -03 अंतराळाच्या भू-सिंक्रोनस हस्तांतरण कक्षामध्ये टाकणार होते. परंतु तिसऱ्या टप्प्यात विभक्त होताना क्रायोजेनिक इंजिनमधील काही तांत्रिक समस्यांमुळे उपग्रह प्रक्षेपणापासून वेगळा झाला. हा उपग्रह जिओस्टेशनरी कक्षेत ठेवला जाणार होता. या प्रक्षेपणाचे काउंटडाउन बुधवारी सकाळी 03.43 वाजता सुरू झाले होते. संपूर्ण मिशन 18 मिनिटे 36 सेकंदात पूर्ण करायचे होते. परंतु मिशन सुरू झाल्यानंतर 10 मिनिटांच्या आत मिशन कंट्रोल रूममध्ये तणावपूर्ण वातावरण दिसून आले. यामुळे असे वाटले की मिशनच्या तिसऱ्या भागात काही तांत्रिक बिघाड दिसला आहे.
काही मिनिटांतच इस्रोचे प्रमुख के सिवन यांनी राष्ट्राला सांगितले की मिशन पूर्ण होऊ शकले नाही. कारण क्रायोजेनिक इंजिनची कामगिरी विसंगत आहे. म्हणजेच अशी कोणतीही तांत्रिक समस्या ज्यामुळे डेटा इस्रोपर्यंत पोहोचू शकला नाही. तसेच त्याच्या मार्गापासून वेगळा झाला. आजचे मिशन GSLV प्रक्षेपणाचे 14 वे मिशन होते. आतापर्यंत 8 पूर्णतः यशस्वी झाले आहेत. तर 4 अपयशी आणि 2 अंशतः यशस्वी झाले आहेत. हेच कारण आहे की जीएसएलव्ही मार्क 1 चे यश दर 29% आहे. तर जीएसएलव्ही मार्क 2 चे यश दर 86% आहे.