Explosion In Gurugram Factory: हरियाणातील गुरुग्राम येथील फायरबॉल बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट; दोघांचा मृत्यू, अनेक कामगार जखमी

स्फोटांमुळे आजूबाजूच्या इमारतींचे नुकसान झाले असून 3-4 जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे.

Explosion In Gurugram Factory (Photo Credit - X/@monu_kumar22)

Explosion In Gurugram Factory: हरियाणातील (Haryana) गुरुग्राम (Gurugram) च्या दौलताबाद औद्योगिक परिसरात (Daulatabad Industrial Area) शुक्रवारी रात्री फायरबॉल बनवणाऱ्या कारखान्यात (Fireball Manufacturing Factory) झालेल्या स्फोटात (Explosion) दोन जण ठार झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या सुमारे 24 गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. स्फोटांमुळे आजूबाजूच्या इमारतींचे नुकसान झाले असून 3-4 जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे.

बॉयलरचा स्फोट झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी हजर आहेत. याठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा -Woman Beaten With A Stick Viral Video: महिलेला काठीने अमानूष मारहाण, मध्य प्रदेशात धार जिल्ह्यातील घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Watch))

पहा व्हिडिओ - 

दरम्यान, या स्फोटानंतर अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी हजर आहेत. एक कामगार सध्या ढिगाऱ्याखाली दबला असून त्याला एसडीआरएफच्या पथकाने वाचवले आहे. रात्री अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. या कारखान्यालगत असलेल्या अन्य दोन कारखान्यांनाही या स्फोटामुळे आग लागली. बचाव कार्यादरम्यान अजूनही छोटे स्फोट होत आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif