Punjab: पंजाबमधील मुक्तसर येथे बेकायदेशीर सुरू असलेल्या फटाक्याच्या कारखान्यात स्फोट; पाच जणांचा मृत्यू
स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यात किमान 34 जण जखमी झाले असल्याचे समोर आले आहे.
Punjab: पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्यात बेकायदेशीर सुरू असलेल्या फटाक्याच्या कारखान्यात मोठी दुर्घटना (Firecracker Factory Blast) घडली. शुक्रवारी झालेल्या मृतांमध्ये बहुतेक उत्तर प्रदेश आणि बिहारमधील रहिवासी होते. तरसेम सिंग हा कारखाना चालवत होता. सिंगवाला गावात ही घटना घडली. कारखान्याचे बांधकाम स्फोटाच्या तीव्रतेमुळे कोसळल्याचा अंदाज आहे. ज्यात अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले.
जखमींना तातडीने ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स), भटिंडासह जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी बहुतेकांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वृत्त आहे. मुक्तसर साहिबचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक अखिल चौधरी म्हणाले की, युनिटच्या उत्पादन सेटअपच्या एका खोलीत स्फोट झाला. ज्यामुळे छत कोसळले. अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले होते पोलिसांना घटनेची माहिती मिळताच बचाव कार्य सुरू करण्यात आले.
#WATCH | Punjab | Several workers are feared trapped after a blast at a firecracker factory in Sri Muktsar Sahib late last night. The rescue operation is underway.
(Source: SSP Pro) pic.twitter.com/vM94VTlq9G
— ANI (@ANI) May 30, 2025
पोलिस उपअधीक्षक जसपाल सिंह यांच्या म्हणण्यानुसार, ढिगाऱ्यातून पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. 29 जखमींना एम्स भटिंडा आणि मुक्तसर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 30, 2025 03:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

