Savita Kanswal Death Due to Avalanche: एव्हरेस्टवीर सविता कंसवालचा द्रौपदी पर्वतावर झालेल्या हिमस्खलनात मृत्यू; अद्याप 20 लोक बेपत्ता

सविता कंसवाल यांचा बर्फात गाडला गेल्याने मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 10 मृतदेह सापडले आहेत.

Savita Kanswal (PC - Twitter)

Savita Kanswal Death Due to Avalanche: एव्हरेस्ट (Mount Everest) विजेती सविता कंसवाल (Savita Kanswal) यांचा मंगळवारी उत्तराखंड (Uttarakhand) मधील उत्तरकाशी जिल्ह्यातील द्रौपदी पर्वतावर झालेल्या हिमस्खलनात (Avalanche) मृत्यू झाला. आतापर्यंत सापडलेल्या मृतदेहांमध्ये सविता कंसवाल यांच्या मृतदेहाचा समावेश आहे. सविता कंसवाल यांचा बर्फात गाडला गेल्याने मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 10 मृतदेह सापडले आहेत. उत्तराखंडच्या डीजीपींनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले, आज हवामान स्वच्छ होते. त्यामुळे एसडीआरएफ, आयटीबीपी आणि एनआयएमची टीम हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने पाठवण्यात आली. 6 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आतापर्यंत सापडलेल्या मृतदेहांची संख्या 10 वर पोहोचली आहे. अद्याप 20 लोक बेपत्ता असून मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) चे पाच कर्मचारी, नेहरू पर्वतारोहण संस्थेतील तीन प्रशिक्षकांचा समावेश असलेली एक टीम शोध आणि बचाव कार्यासाठी संस्थेच्या डोकरानी बामक ग्लेशियर बेस कॅम्पवर उतरवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील सरसावा येथील भारतीय हवाई दलाच्या तळावरून दोन हेलिकॉप्टरने हिमस्खलनाच्या जागेची पाहणी केली. (हेही वाचा -Cheetah Helicopter Crash in Arunachal Pradesh: अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले, पायलटचा मृत्यू)

संस्थेचे प्राचार्य कर्नल अमित बिश्त यांनी सांगितले की, उत्तरकाशीस्थित एनआयएमचे 34 प्रशिक्षणार्थी गिर्यारोहक आणि सात प्रशिक्षकांचा एक संघ शिखरावरून परतत असताना सकाळी 9.45 वाजता सुमारे 17,000 फूट उंचीवर हिमस्खलन झाले. कर्नल बिश्त म्हणाले की हिमस्खलनानंतर टीमचे सदस्य बर्फाच्या जाळ्यात अडकले.

यातील दहा मृतदेह सापडले असून त्यापैकी चार मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अंधार आणि खराब हवामानामुळे रात्री बचावकार्य थांबवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. उत्तरकाशीचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देवेंद्र पटवाल यांनी आदल्या दिवशी सांगितले होते की, अडकलेल्यांपैकी आठ जणांची सुटका करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, गृहमंत्री अमित शहा आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif