Jharkhand Shocker: फोनवर बोलणाऱ्या आईला बाळाच्या रडण्याचा त्रास, संतापाच्या भरात पोटच्या जीवाची हत्या, पोलिसांकडून अटक
अफसानाचे सासरे आणि तक्रारदार रोजन अन्सारी यांनी सांगितले की, गुरुवारी अफसानाचे तिच्या पतीसोबत भांडण झाले. त्यानंतर तिने आपल्या लहान मुलासोबत स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतले. अफसाना फोनवर बोलत असताना मुलगा रडू लागला. त्यामुळे अफसाना चिडली. तिने मुलाला शांत करण्याऐवजी त्याचा गळा दाबला.
Jharkhand Shocker: झारखंडमधील (Jharkhand) गिरिडीह जिल्ह्यातील एका महिलेने आपल्या 2 वर्षाच्या मुलाचा गळा दाबून खून (Murder) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही महिला फोनवर बोलत असताना मुलगा रडू लागला. त्यामुळे महिलेला संताप अनावर झाला आणि तिने मुलाचा गळा दाबला. अफसाना खातून असं या महिलेचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, अफसानाने सहा वर्षांपूर्वी निजामुद्दीनशी लग्न केले होते. या जोडप्याला चार आणि दोन वर्षांची दोन मुले होती.
अफसानाचे सासरे आणि तक्रारदार रोजन अन्सारी यांनी सांगितले की, गुरुवारी अफसानाचे तिच्या पतीसोबत भांडण झाले. त्यानंतर तिने आपल्या लहान मुलासोबत स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतले. अफसाना फोनवर बोलत असताना मुलगा रडू लागला. त्यामुळे अफसाना चिडली. तिने मुलाला शांत करण्याऐवजी त्याचा गळा दाबला. (हेही वाचा -Hydrabad Shocker: पत्नीशी संपत्तीवरून वाद, पतीची गळफास घेऊन आत्महत्या, हैद्राबाद येथील घटना)
अफसानाने थोडा वेळ दरवाजा उघडला नाही. काही वेळानंतर पतीला झोपण्यासाठी खोलीत बोलावले असता त्यांना त्यांचा मुलगा बेशुद्धावस्थेत आढळला. मुलाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. (हेही वाचा - Bengaluru Shocker: कॉम्प्लेक्सच्या स्विमिंग पूलमध्ये 9 वर्षाच्या मुलीचा सापडला मृतदेह, पोलिसांचा तपास सुरू, बेंगळुरू येथील घटना)
तथापी, महिला आरोपी अफसानाला अटक करण्यात आली आहे. अफसानाने दावा केला आहे की, तिचा आपल्या मुलाला मारण्याचा हेतू नव्हता. परंतु, त्याच्या रडण्याने संताप अनावर झाल्याने तिने त्याला ढकलले आणि तो बेडवरून पडला. पोलिसांनी मुलाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून पुढील तपास सुरू केला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Dec 30, 2023 04:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

