Delhi Crime: वृद्ध जोडपं राहत्या घरात आढळले मृतावस्थेत, तपास सुरू

राधे श्याम वर्मा आणि त्यांची पत्नी वीणा यांच्या घराचीही तोडफोड झाल्याचे आढळून आले, असे पोलीस उपायुक्त (ईशान्य), जॉय तिर्की यांनी सांगितले.

Dead| Photo Credit - Pixabay

सोमवारी सकाळी ईशान्य दिल्लीतील (Delhi) गोकलपुरी (Gokalpuri) भागात एका वृद्ध जोडप्याचा गळा चिरून मृतावस्थेत आढळून आला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

राधे श्याम वर्मा आणि त्यांची पत्नी वीणा यांच्या घराचीही तोडफोड झाल्याचे आढळून आले, असे पोलीस उपायुक्त (ईशान्य), जॉय तिर्की यांनी सांगितले. वृद्ध दाम्पत्य घराच्या तळमजल्यावर राहत होते, तर त्यांचा मुलगा रवी रतन, पत्नी आणि सहा वर्षांचा मुलगा घराच्या पहिल्या मजल्यावर राहत होता. राधेश्याम हे दिल्लीच्या करोलबाग येथील सरकारी शाळेतून उपप्राचार्य म्हणून निवृत्त झाले होते. हेही वाचा HC On Custody To Father: मुलगी आईसोबत Comfortable नसेल तर तिला वडिलांच्या ताब्यात देणे आवश्यक; पाटणा उच्च न्यायालयाचा निर्णय

गेल्या 38 वर्षांपासून हे कुटुंब घरात राहत असल्याचे डीसीपींनी सांगितले.  घरातून काही दागिने आणि ₹ 4.5 लाख गायब आहेत, असे पोलिसांनी सांगितले.  राधेश्यामने अलीकडेच घराचा मागील भाग विकण्यासाठी पाच लाख रुपये अॅडव्हान्स म्हणून घेतले होते, असे टिर्की यांनी सांगितले. रविवारी रात्री साडेदहा वाजता रतनने आपल्या आई-वडिलांना अखेरचे पाहिले होते. पुढील तपास सुरू आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif