10th and 12th Board Examinations 2021: इयत्ता 10 दहावी, बारावी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने नियोजीत वेळेत पार पडणार -वर्षा गायकवाड

परीक्षा ऑफलाईन घेण्याबाबत निर्णय झाला आहे. त्यासाठी अभ्यासक्रम कमी करण्याचाही प्रयत्न ऑगस्टमध्ये पार पडला. त्यानुसार पेपर पॅटर्न, तसेच त्याच्या तपासणीबाबात नोब्हेंबरमध्ये निश्चिती ठरते. कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे.

Exam | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षा (Board Examinations 2021) ऑफलाईनच होणार असून, ती नियोजीत वेळापत्रकानुसारच होईल, अशी माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली आहे. बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार इयत्ता दहावीची परीक्षा 29 एप्रील ते 20 दरम्यान होणार आहे. तर इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा 23 एप्रीयल ते 21 मे या कालावधी दरम्यान, पार पडणार आहे. या परीक्षा सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 आणि दुपारी 3 ते सायंकाळी 6 या सत्रात पार पडतील.

वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, ऑफलाईन परीक्षा घेण्याबाबत आम्ही शिक्षण विभागातील तज्ज्ञांशी बोलत आहोत. परीक्षा ऑफलाईन घेण्याबाबत निर्णय झाला आहे. त्यासाठी अभ्यासक्रम कमी करण्याचाही प्रयत्न ऑगस्टमध्ये पार पडला. त्यानुसार पेपर पॅटर्न, तसेच त्याच्या तपासणीबाबात नोब्हेंबरमध्ये निश्चिती ठरते. कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. (हेही वाचा, Final Year MBBS Exam: मुंबईत 8 मार्चपासून एमबीबीएसच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला सुरूवात होणार)

कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरु आहे. हे शिक्षण असेच सुरु ठेवण्यात येणार आहे. कारण काही ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने सुरु झालेल्या शाळा बंद ठेवाव्या लागत आहेत. आठवी, नववीच्या शाळांबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. कारण इयत्ता नववीचा विद्यार्थी जर शेवटपर्यंत टिकला नाही तर पुढच्या वर्षी म्हणजेच इयत्ता दहावीसाठी विद्यार्थी तयारच कसा होईल? त्यामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन, ऑफलाई असे शक्य त्या माध्यमातून शिक्षण सुरु राहील असेही वर्षा गायकवाड यांनी या वेळी सांगितले.