UPSC IES Prelims 2021 Timetable Released: भारतीय इंजिनियरिंग सर्व्हिस परीक्षेचं यंदाचं वेळापत्रक upsc.gov.in वर जारी
यंदाच्या ESE 2021 परीक्षेमधून 215 जागांसाठी उमेदवार निवडले जाणार आहेत. पण त्यासाठी प्रिलिम्स करिता देशभरातून अंदाजे 2-3 लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे.
Indian Engineering Services Exam 2021 च्या प्रिलिम्स आता 18 जुलै पासून सुरू होणार आहेत. Union Public Service Commission कडून या परीक्षांचं नवं वेळापत्रक त्यांच्या अधिकृत संकेतस्थळ upsc.gov.in वर प्रसिद्ध केले आहे. दरम्यान ही परीक्षा 2 सेशन मध्ये होणार आहे. पहिलं सेशन सकाळी 10 ते 12 या वेळेत असेल या मध्ये जनरल स्टडीज आणि इंजिनियरिंग अॅप्टिट्युट पेपर यांचा समावेश असेल. ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाच्या परीक्षेमध्ये 200 गुणांची परीक्षा 2 तास चालणार आहे. दरम्यान दुसर्या सत्रासाठी 2 ते 5 या वेळेत इंजिनियरिंग डिसिप्लिन्स हा 3 तासाचा पेपर असेल त्यासाठी 300 गुण आहेत. UPSC IES ISS 2020 Interview Schedule: युपीएससी कडून आयईएस,आयएसएस च्या मुलाखत फेरीचे वेळापत्रक upsc.gov.in वर जारी.
जे विद्यार्थी या प्रिलिम्स मधून उत्तीर्ण होणार आहेत त्यांना मेन्स आणि मुलाखतीच्या फेरीसाठी संधी मिळणार आहे. Engineering Services Exam मधून निवडलेले विद्यार्थी युपीएससी Survey of India Group 'A' Service, Indian Defence Service of Engineers, Indian Naval Armament Service, Indian Skill Development Service, Central Engineering Service (Roads), Central Power Engineering Service, Indian Radio Regulatory Service and other services सेवेत दाखल होतात.
यंदाच्या ESE 2021 परीक्षेमधून 215 जागांसाठी उमेदवार निवडले जाणार आहेत. पण त्यासाठी प्रिलिम्स करिता देशभरातून अंदाजे 2-3 लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे. ही लेखी परीक्षा देशभरात 15 सेंटर्स वर आयोजित करण्यात आली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी होती मात्र आता युपीएससीने परीक्षेचे वेळापत्रक जारी केले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)