UPSC CSE Final Result 2022 Out: नागरी सेवा परिक्षेत मुलींची बाजी, पाहा टॉपर्सची यादी; रिजल्ट कसा कराल डाऊनलोड? घ्या जाणून

या वेळी निकालामध्ये मुलींनी बाजी मारली असून त्यांचाच वरचष्मा असल्याचेही पाहायला मिळाले. हा निकाल UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर उपलब्ध आहे.

UPSC Result | File Image Used For representational Purpose

How to Download UPSC CSE Final Result: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे घेण्यात आलेल्या नागरी सेवा अंतिम परीक्षेचा निकाल (Public Service Commission Result ) त्यांच्या जाहीर झाला आहे. या वेळी निकालामध्ये मुलींनी बाजी मारली असून त्यांचाच वरचष्मा असल्याचेही पाहायला मिळाले. हा निकाल UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर उपलब्ध आहे. जो परीक्षेला बसलेले उमेदवार जाणून घेऊ शकतात. हा निकाल अधिकृत संकेतस्थलावर पाहता येईल आणि तो डाउनोल करुन त्याची प्रिंटही काढता येऊ शकेल. परीक्षेतील टॉपर्सची यादी आपण येथे पाहू शकता. तसेच, निकाल कसा पाहायचा, डाऊनलोड करायचा याबाबतही आवश्यक माहिती आपण येथे वाचू शकता.

यूपीएससी (UPSC) परिक्षेत दिला जाणारा AIR 1 इतिशा किशोर हिने पटकावला. इतिशासोबतच गरिमा लोहिया, उमा हराथी एन यांनी परिक्षेत अव्वल स्थान मिळवले. UPSC CSE प्रिलिम्स परीक्षा 5 जून 2022 रोजी घेण्यात आली. ज्याचा निकाल 22 जून रोजी निकाल जाहीर करण्यात आला. मुख्य परीक्षा 16 ते 25 सप्टेंबर दरम्यान घेण्यात आली आणि 6 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात आला. मुलाखत 18 मे 2023 पर्यंत घेण्यात आली. लेखी चाचणी आणि मुलाखतींच्या आधारे आयोगाने निवडलेल्या उमेदवारांची यादी आपल्या वेबसाइटवर अपलोड केली आहे. (हेही वाचा, UPSC Exam Calendar 2024: यूपीएससी कडून CSE Prelims, NDA, CDS Exams ते ESE Prelims 2024 कधी? upsc.gov.in वर पहा वेळापत्रक)

ट्विट

UPSC नागरी सेवा अंतिम निकाल 2022-23: कसे डाउनलोड करावे?

निकालांनुसार, भारतीय प्रशासकीय सेवेसारख्या विविध सेवांमध्ये नियुक्तीसाठी 933 उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. ज्यामध्ये 'भारतीय परराष्ट्र सेवा', 'भारतीय पोलीस सेवा' आणि 'केंद्रीय सेवा' यांचा समावेश आहे. 'गट A' आणि 'गट B'. उमेदवार अधिकृत वेबसाइटवर रोल नंबर आणि नावानुसार नागरी सेवा परीक्षा निकाल 2022 तपासू शकतात.