UPSC Civil Service Main Admit Card 2022 Released: यूपीएससी सनदी सेवा मुख्य परीक्षा 2022 ची हॉल तिकीट्स जारी; upsc.gov.in वरून अशी करा डाऊनलोड
आता त्यामधून पुढील परीक्षेसाठी पात्र झालेले विद्यार्थी मुख्य परीक्षा देतील आणि त्याच्या निकालानंतर मुलाखतीच्या फेरीसाठी काही उमेदवारांची निवड होईल. या तिन्ही परीक्षांचा टप्पा पार केल्यानंतर अंतिम निकाल लावला जातो.
युपीएससी (UPSC) कडून सनदी सेवेच्या मुख्य परीक्षा 2022 ची हॉल तिकीट्स जारी केली आहेत. परीक्षार्थ्यांना आपली हॉल तिकीट्स यूपीएससी ची मुख्य वेबसाईट upsc.gov.in वरून डाउनलोड करता येणार आहे. यंदा मुख्य परीक्षा सप्टेंबर 16,17,18,24 आणि 25 सप्टेंबर दिवशी घेतली जाणार आहे. या परीक्षा 2 सत्रांमध्ये होणार आहेत. सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 2 ते 5 या दोन शिफ्ट्स असतील. दरम्यान यूपीएससी कडून घेण्यात आलेल्या प्रिलिम्स परीक्षा (Prelims Exam) देऊन पुढील परीक्षेसाठी पात्र झालेले उमेदवारचं ही मुख्य परीक्षा देऊ शकतात.
यूपीएससी मुख्य परीक्षेचं हॉल तिकीट कसं डाऊनलोड कराल?
- यूपीएससी ची मुख्य वेबसाईट upsc.gov.in ला भेट द्या.
- होम पेजवर ‘What’s New’ section ला भेट द्या.
- “e-Admit Card – Civil Services (Main) Examination, 2022.”या लिंकवर क्लिक करा.
- आता सार्या सूचना नीट वाचा आणि येस पर्यायावर क्लिक करा.
- आता दोन लॉगिन पर्याय दिसतील. यामध्ये एकतर रोल नंबर टाकून किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुम्ही लॉगिन करू शकाल.
- विचारलेली सारी माहिती नीट भरा. नंतर सबमीट पर्यायावर क्लिक करा.
- तुमच्या स्क्रिनवर UPSC Civil Service Main Admit card 2022 दिसेल.
- आता हे कार्ड डाऊनलोड करून तुम्ही प्रिंट आऊट काढू शकता.
यूपीएससी कडून प्रिलिम्स परीक्षेचा निकाल 22 जून 2022 दिवशी जाहीर करण्यात आला आहे. आता त्यामधून पुढील परीक्षेसाठी पात्र झालेले विद्यार्थी मुख्य परीक्षा देतील आणि त्याच्या निकालानंतर मुलाखतीच्या फेरीसाठी काही उमेदवारांची निवड होईल. या तिन्ही परीक्षांचा टप्पा पार केल्यानंतर अंतिम निकाल लावला जातो. ही देशात सर्वात कठी स्पर्धा परीक्षा मानली जाते.