UPSC Civil Service Examination 2022 साठी रजिस्ट्रेशन सुरू; upsconline.nic.in वर असा करा अर्ज

सिव्हिल सर्व्हिस प्रिलिम्स 2022 यंदा यूपीएससीकडून रविवार 5 जून 2022 दिवशी आयोजित करण्यात आली आहे.

UPSC | Representational Image (Photo Credits: PTI)

यूपीएससी कडून Civil Service (Preliminary) Examination 2022 साठी ऑनलाइन अ‍ॅप्लिकेशन सुरू करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांना या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी यूपीएससी ची अधिकृत वेबसाईट upsconline.nic.in ला भेट द्यावी लागणार आहे. दरम्यान ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशनची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी 2022 दिवशी आहे.

सिव्हिल सर्व्हिस प्रिलिम्स 2022 यंदा यूपीएससीकडून रविवार 5 जून 2022 दिवशी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करू शकतात. हे देखील नक्की वाचा: UPSC ESE Prelims Admit Card 2022: यूपीएससी च्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेचं प्रवेशपत्र upsc.gov.in वरून असं करा डाऊनलोड! 

Civil Service (Preliminary) Examination 2022 साठी अर्ज कसा कराल?

नोटिफिकेशनद्वारा, चेन्नई, दिसपूर, कोलकाता आणि नागपूर वगळता प्रत्येक केंद्रावर उमेदवारांच्या संख्येची कमाल मर्यादा असेल. आयोग first-apply, first-allot तत्त्वावर आधारित केंद्रांचे वाटप करणार आहे आणि क्षमता प्राप्त झाल्यावर विशिष्ट केंद्र गोठवले जाईल.

UPSC ने उमेदवारांना त्यांच्या आवडीचे केंद्र मिळविण्यासाठी लवकर अर्ज करण्याचा सल्ला दिला आहे. प्राथमिक परीक्षेसाठी पात्र ठरलेले उमेदवार नागरी सेवा (मुख्य) परीक्षा २०२२ मध्ये बसण्यास पात्र असतील.