UPSC CDS 2 Exam Final Result: UPSC CDS परिक्षेचा अंतीम निकाल जाहीर, UPSC च्या अधिकृत वेबसाईटवर पाहा निकाल

UPSC Combine Defence Services Exam 2 या परिक्षेचा अंतीम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असुन परिक्षा दिलेले उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहू शकतात.

Representational photo (Photo Credit - PTI )

UPSC कंम्बाईन डिफेन्स सर्विसेस म्हणजेच (UPSC Combine Defence Services Exam 2) या परिक्षेचा अंतीम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. परिक्षा दिलेले उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाईटवर (Website) निकाल पाहू शकतात. आजच या परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असुन पुढील दोन आठवड्यात उमेदवारांचे प्राप्त गुण उपलब्ध करण्यात येतील, अशी माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे. तरी UPSC CDS अंतीम परिक्षेच्या (Exam Final Result) निकालाची वाट बघत असणाऱ्या उमेदवारांसाठी आयोगाकडून ही घोषणा करण्यात आली आहे. दरवर्षी देशातील हजारो उमेदवार CDS परिक्षा देतात. या परिक्षेच्या माध्यमातून नौदल (Indian Navy), वायुदल (Indian Air Force) आणि भारतीय आर्मी (Indian Army) ऑफिसर्सच्या (Officers) रिक्त पदांसाठी पदभरती होतात.

 

UPSC CDS परिक्षा देणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात असली तरी UPSC Combine Defence Services Exam 2 यांत एकूण 214 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. आता हे उमेदवार कोण, कुठले आणि निकालासंबंधी सविस्तर माहिती UPSC च्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. या परिक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना नौदल, वायुदल आणि भारतीय आर्मी यांत नोकरीची संधी मिळणार आहे. दरवर्षी इंडियन मिलिटरी अकादमी (Indian Military Academy), ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (Officers Training Academy), इंडियन नेव्हल अकादमी (Indian Navy Academy) आणि इंडियन एअर फोर्स (Indian Air Force) अकादमीमध्ये कमिशन्ड ऑफिसर्सच्या भरतीसाठी युनियन लोकसेवा आयोगाद्वारे संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा घेतली जाते. (हे ही वाचा:- Job Recruitments: LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, अनेक पदांसाठी भरती जाहीर!)

 

उमेवारांनी निकाल बघण्यासाठी UPSC च्या अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर जा. त्या वेबसाईटवर फायनल रिझल्ट असा ऑप्शन येईल त्यावर क्लीक करा. त्यानंतर संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II), 2021 (OTA) असा ऑप्शन दिसेल आणि त्यापुढे PDF दिसेल. त्या पिडीएफ वर क्लिक करुन तुम्ही तुमचा रिसल्ट सहज पाहू शकता. त्या पिडीएफ मधील यादीत तुमचं नाव असल्यास तुम्ही परिक्षा पास झाली आहात असं समजा. तसेच तुमच्या सोयीसाठी तुम्ही ही  PDF डाउनलोड करु शकता.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now