IPL Auction 2025 Live

Unrecognised Schools In Navi Mumbai: नवी मुंबई महानगरपालिकेने जाहीर केली शहरातील अनधिकृत शाळांची यादी; पालकांना आपल्या पाल्यासाठी प्रवेश घेणे टाळण्याचे आवाहन (See List)

त्यांनी राज्याची किंवा महामंडळाची कोणतीही मान्यता घेतलेली नाही. शाळेने आपला व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला तरीही, येथे शिकणाऱ्यांचे भविष्य धोक्यात येईल.’

Students | Representational Image | (Photo Credits: PTI)

Unrecognised Schools In Navi Mumbai: नवी मुंबईमधील (Navi Mumbai) विद्यार्थी आणि पालकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. नवी मुंबईच्या आसपासच्या शाळांमध्ये आपल्या पाल्यासाठी प्रवेश घेणाऱ्या पालकांना नवी मुंबई महानगरपालिकेने (NMMC) सावध केले आहे. राज्याची कोणतीही मान्यता नसलेल्या अनधिकृत अशा पाच शाळा शहरात सुरू आहेत व अशा शाळांमध्ये आपल्या मुलासाठी प्रवेश घेणे टाळा असे पालिकेने सांगितले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी शहरातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे.

अनधिकृत म्हणून घोषित करण्यात आलेल्या पाच शाळा-

या बेकायदा घोषित केलेल्या सर्व शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत.

नागरी संस्थेने या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये असे सांगितले आहे. तसेच या शाळांमध्ये आधीच शिकत असलेल्यांना सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेण्यास सांगितले आहे. याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले, ‘या शाळा योग्य प्रक्रियेचे पालन न करता कार्यरत आहेत. त्यांनी राज्याची किंवा महामंडळाची कोणतीही मान्यता घेतलेली नाही. शाळेने आपला व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला तरीही, येथे शिकणाऱ्यांचे भविष्य धोक्यात येईल.’ (हेही वाचा: Rising Expenses of Education Worries For Parents: शिक्षणावरील वाढता खर्च पालकांसाठी चिंता, Gurugram येथील व्यक्ती X पोस्टमुळे चर्चेत)

या शाळांना, शिक्षण हक्क कायद्यानुसार परवानग्या मिळवा किंवा दंडात्मक कारवाईसाठी तयार राहा, अशा सूचना देणाऱ्या नोटिसा बजावण्यात येणार असल्याचे महामंडळाने म्हटले आहे. दरम्यान याआधी डिसेंबर 2023 मध्ये, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी लेखी उत्तरात माहिती दिली होती की, महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे चालवल्या जाणाऱ्या 661 शाळांवर कारवाई सुरू करण्यात आली असून खासगी संस्थांना दंड ठोठावण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) हद्दीत सुरू असलेल्या 186 बेकायदेशीर शाळांची माहिती त्यांच्या विभागाकडे असल्याची पुष्टीही केसरकर यांनी केली होती.