IPL Auction 2025 Live

UGC NET 2023 Result: आज जाहीर होणार यूजीसी नेट परीक्षेचा निकाल; ugcnet.nta.nic.in वर असे पहा तुमचे गुण!

आज निकालानंतर पात्र उमेदवार भारतीय विद्यापीठंआणि महाविद्यालयांमध्ये ‘असिस्टंट प्रोफेसर’ तसेच ‘ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि असिस्टंट प्रोफेसर’साठी पात्र असणार आहेत.

Results | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

एनटीए (NTA) कडून आज (13 एप्रिल) डिसेंबर सत्राच्या UGC NET परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे. सुमारे 8 लाख विद्यार्थी या निकालाच्या प्रतिक्षेमध्ये आहेत. आज उमेदवारांना त्यांचा निकाल अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.nic.in आणि ntaresults.nic.in. वर पाहता येणार आहे. काल (12 एप्रिल) UGC Chairman M Jagadesh Kumar यांनी ट्वीट करत एनटीए कडून आज निकाल जाहीर करणार असल्याचे जाहीर केले आहे. निकाल जाहीर होताच उमेदवार ऑनलाईन पोर्टल वर आपला अ‍ॅप्लिकेशन नंबर, जन्म तारीख टाकून आपले गुण पाहू शकणार आहेत.

NTA ने आंसर की  23 मार्च 2023 रोजी प्रसिद्ध  केलीआणि आक्षेप नोंदवण्याची शेवटची तारीख 25 मार्च रात्री 11.50 पर्यंत होती. त्यानंतर  नॅशनल टेस्टिंग एजन्सीने अंतिम आंसर की देखील जारी केली. आज निकालानंतर पात्र उमेदवार भारतीय विद्यापीठंआणि महाविद्यालयांमध्ये ‘असिस्टंट प्रोफेसर’ तसेच ‘ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि असिस्टंट प्रोफेसर’साठी पात्र असणार आहेत.

कसा पहाल निकाल?

दरम्यान अधिकृत माहितीनुसार, 8,34,537 उमेदवारांनी यंदा

UGC NET 2023 ची परीक्षा दिली होती. यामध्ये 83 विषयांचा समावेश होता. 21 फेब्रुवारी ते 16 मार्च दरम्यान 5 टप्प्यामध्ये ही परीक्षा झाली. नक्की वाचा: NTA Examination Calendar for Academic Year 2023-24: एनटीए कडून JEE Main, NEET UG, CUET परीक्षांच्या तारखा जाहीर .

कट ऑफ मार्क्स अजून जाहीर झालेले नाहीत.पण सामान्यपणे सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी किमान पात्रता गुण 40 टक्के आहेत आणि आरक्षित श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी (OBC, PWD, SC/ST) दोन्ही पेपर I आणि II साठी 35 टक्के गुण आवश्यक आहेत.