TET Qualifying Certificate Validity: मोदी सरकारचा मोठा निर्णय; TET योग्यता प्रमाणपत्राची वैधता आता 7 वर्षावरून आजीवन
यापूर्वी हे प्रमाणपत्र 7 वर्षांसाठी मर्यादित होते.
केंद्र सरकार कडून शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी च्या योग्यता प्रमाणपत्राच्या (TET Certificates) वैधतेला आता आजीवन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी हे प्रमाणपत्र 7 वर्षांसाठी मर्यादित होते. आता निर्णय 2011 पासून लागू होणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी गुरूवारी त्याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता ज्यांच्या प्रमाणपत्रांचा 7 वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे त्यांच्याबद्दल निर्णय राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश घेईल. त्यांना नव्या टीईटी प्रमाणपत्राची पुर्तता किंवा त्याच्या वैधतेच्या कालमर्यादेचा निर्णय स्थानिक प्रशासन घेणार आहे. केंद्र सरकारच्याया निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये करियर करणार्या इच्छुक उमेदवारांच्या रोजगाराच्या संधी वाढण्याची शक्यता आहे.
ANI Tweet
दरम्यान शाळेत शिक्षक म्हणून रूजू होण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला हे शिक्षल पात्रता परीक्षा योग्यता प्रमाणपत्र आवश्यक असते. राष्ट्रीय शिक्षक शिक्षा परिषद म्हणजेच एनसीटीई ने 11 फेब्रुवारी 2011 दिवशी जारी केलेल्या नियमांनुसार राज्य सरकार टीईटी परीक्षा आयोजित करणार आणि टीईटी योग्यता प्रमाणपत्र वैधता कालावधी परीक्षा उर्तीर्ण झाल्यानंतर 7 वर्ष असेल.