IPL Auction 2025 Live

SSC Released 2020 Exam Dates: स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून CGL, CHSL, JE, MTS परीक्षांच्या तारखा जाहीर; ssc.nic.in वर पहा वेळपत्रक

सरकारी नोकरीच्या शोधात असणार्‍यांसाठी आज स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून आगामी वर्षातील म्हणजेच 2020-21 साठीच्या CGL, CHSL, JE, MTS परीक्षांसाठीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फेसबुक)

सरकारी नोकरीच्या शोधात असणार्‍यांसाठी आज स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) कडून आगामी वर्षातील म्हणजेच 2020-21 साठीच्या CGL, CHSL, JE, MTS परीक्षांसाठीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यामध्ये पदवीधर विद्यार्थ्यांना सरकारी कार्यालयात रूजू करून घेण्यासाठी परीक्षा घेतल्या जातात. दरम्यान यापूर्वी काही परीक्षांसाठी वेळापत्रक ssc.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आले आहे. तर उर्वरित 4 परीक्षांसाठी आज तारख्या जाहीर झाल्या आहेत. दरम्यान SSC Exams 2020 मध्ये SSC JE  साठी रजिस्ट्रेशन 1 ऑक्टोबर पासून सुरू होईल. SSC CHSL चं रजिस्ट्रेशन   6 नोव्हेंबर पासून सुरू होईल. तर Tier I ची परीक्षा 12 एप्रिल ते 27 एप्रिल 2021 मध्ये होणार आहे. SSC CGL चं रजिस्ट्रेशन 21 डिसेंबर 2020 पासून केले जाणार आहे.

आज स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून ज्युनियर इंजिनियर ( सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल अ‍ॅन्ड क्वॅन्टिटी सर्व्हेईंग आणि कॉन्ट्रॅक्ट्स) परीक्षा, स्टेनोग्राफर ग्रेड सी (Stenographer Grade ‘C’) आणि डी (D) परीक्षा, कम्बाईंड ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षा (Combined Graduate Level Examination), कम्बाईन्ड हायर सेकंडरी लेव्हल एक्झामिनेशन (Combined Higher Secondary Level Examination) अ‍ॅन्ड मल्टी टास्किंग़ स्टाफ एक्झामिनेशन (Multi Tasking (Non-Technical) Staff Examination) यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या परीक्षा दरम्यान होतील असे सांगण्यात आले आहे. इथे पहा अधिकृत परिपत्रक!

दरम्यान SSC ने प्रसिद्ध केलेल्या 17 सप्टेंबरच्या परिपत्रकामध्ये सिलेक्शन पोस्ट एक्झामिनेशन (Selection Posts Examination), दिल्ली पोलिस सब इन्स्पेक्टर, CAPFs परीक्षा आणि ज्युनियर हिंदी भाषांतरकार(Junior Hindi Translator), ज्युनियर ट्रान्सलेटर आणि सिनियर हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा ( Junior Translator and Senior Hindi Translator Examination) ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. परीक्षा झाल्यानंतर त्याचे ऑनलाईन निकाल आणि उत्तर सूची देखील प्रसिद्ध केल्या जातात.