SSC CGL 2020 Results for Tier 2: स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून SSC Combined Graduate Level 2020 Tier 2 Exam चा निकाल जाहीर

SSC CGL 2020 Tier 2 Exam ची अंतिम उत्तरसूची 5 मे ला ssc.nic.in वर जाहीर केली जाईल. परिक्षा दिलेल्यांचे SSC CGL Tier 2 Scorecard 5 ते 26 मे 2022 पर्यंत उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Results | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून SSC CGL 2020 Results for Tier 2 जाहीर करण्यात आला आहे. 26 एप्रिल दिवशी हा निकाल जाहीर झाला असून SSC Combined Graduate Level 2020 Tier 2 Exam ला बसलेले विद्यार्थी आता त्यांचा निकाल पाहू शकतात. हा निकाल स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाईट वर जाहीर करण्यात आला आहे. यंदा SSC CGL Tier 2 Exam ही जानेवारी 28,29 दिवशी झाली होती. आता त्याचा निकालही जाहीर झाला आहे.

SSC CGL 2020 Results कसा पहाल ऑनलाईन?

  • स्टाफ सिलेक्शनची अधिकृत वेबसाईट ssc.nic.in ला भेट दया.
  • होम पेजवरील Results tab वर क्लिक करा.
  • आता एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये “Combined Graduate Level 2020 Tier 2 Results” या लिंक वर क्लिक करा.
  • निकालाची यादी पीडीएफ स्वरूपात आहे तुमचा निकाल पाहण्यासाठी Ctrl+F दाबून सर्च बॉक्स मध्ये तुमचा रोल नंबर टाकून निकाल पहा.

Tier 2 Exam च्या निकालावर आता विद्यार्थी CGL 2020 Tier 3 Exam साठी पात्र होतात. ही परीक्षा फेब्रुवारी 6, 2022 ला घेण्यात आली आहे. टियर 2 साठी घोषित केलेल्या निकालांमध्ये त्यांच्या टियर 3 परीक्षेच्या मूल्यांकनासाठी निवडलेल्या उमेदवारांच्या यादीचा उल्लेख आहे. म्हणून, SSC CGL 2020 टियर 3 पेपरचे मूल्यमापन फक्त अशा उमेदवारांसाठी केले जाईल ज्यांनी SSC CGL 2020 टियर 2 परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि आयोगाने जारी केलेल्या यादीमध्ये त्यांचा उल्लेख आहे. हे देखील नक्की वाचा: MPSC Stenographer Recruitment 2022: दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी; 12 मे पूर्वी करा mpsconline.gov.in वर अर्ज .

SSC CGL 2020 Tier 2 Exam ची अंतिम उत्तरसूची 5 मे ला ssc.nic.in वर जाहीर केली जाईल. परिक्षा दिलेल्यांचे SSC CGL Tier 2 Scorecard 5 ते 26 मे 2022 पर्यंत उपलब्ध करून दिले जाणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now