Software Company IceWarp 2023 च्या अखेरीस कर्मचारी संख्या दुप्पटीने वाढवणार
सॉफ्टवेअर कंपनी IceWarp नववर्षात म्हणजेच 2023 मध्ये (Jobs In 2023) भारतातील कर्मचाऱ्यंची संख्या जवळपास दुप्पट करणार आहे. कंपनीने आज (शुक्रवार, 23 डिसेंबर) ही घोषणा केली. कंपनीच्या भारतीय संघात सध्या 100 कर्मचारी आहेत. वाढता व्याप विचारात घेता कंपीनने आता मनुष्यबळाचा (Manpower In IceWarp) विस्तार करण्याचा विचार सुरु केला आहे.
सॉफ्टवेअर कंपनी IceWarp नववर्षात म्हणजेच 2023 मध्ये (Jobs In 2023) भारतातील कर्मचाऱ्यंची संख्या जवळपास दुप्पट करणार आहे. कंपनीने आज (शुक्रवार, 23 डिसेंबर) ही घोषणा केली. कंपनीच्या भारतीय संघात सध्या 100 कर्मचारी आहेत. वाढता व्याप विचारात घेता कंपीनने आता मनुष्यबळाचा (Manpower In IceWarp) विस्तार करण्याचा विचार सुरु केला आहे. त्यासाठी कंपनी आता मुंबईत नवीन कार्यालयाही सुरु करणार असून, त्याचे लवकर उद्घाटनही होणार आहे. कंपनीच्या या धोरणामुळे राज्यातील तरुणांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे. कंपनीने खरोखरच नोकरभरती केल्यास अनेकांच्या हाताला काम मिळणार आहे.
आइसवार्प इंडिया आणि मिडल इस्ट सीईओ प्रमोद शारदा यांनी एका निवेदनात सांगितले की, आम्हाला विश्वास आहे की मुंबईतील आमच्या कार्यालयाच्या विस्तारामुळे या प्रदेशाप्रती आमची बांधिलकी आणखी मजबूत होईल. आम्ही सर्व आकारांच्या संस्थांना अखंडपणे सहयोग सुसंवादासाठी पर्याय देण्यास उत्सुक आहोत. IceWarp कंपनीने म्हटले आहे की, मोठ्या कार्यालयामुळे कंपनीच्या टीमला विविध विभागांमध्ये नविन समसाधने सामावून घेता येणे शक्य होईल. तसेच, वाढत्या व्यवसायाच्या वाढत्या गरजा आणि त्याची पूर्णता करण्यसाठी हे मनुष्यबळकामी येईल. (हेही वाचा, Talathi Bharti 2022: राज्यात तलाठी पदासाठी होणार मेगाभरती, राज्य सरकारकडून मोठी घोषणा)
ट्विट
IceWarp व्यवसायांसाठी परवडणारे, एकात्मिक आणि वापरण्यास सुलभ संवाद माध्यम पुरवते.ज्यामुळे Microsoft 365 आणि Google Workspace ला एक भक्कम पर्याय उभा राहतो. सध्या ही कंपनी 50 देशांमध्ये सेवा देते. या कंपनीचे भारतात सुरु होणारे हे नवीन कार्यालय देशाच्या बिझनेस हबच्या केंद्रस्थानी असलेल्या IceWarp चे पाऊल वाढवते. देशात व्यवसायवृद्धी करण्यासाठी कंपनीचे स्थान भक्कम राहील. त्यासोबतच मार्केटिंग, सेल्स, ऑपरेशन्स, सीआरएम आणि ब्रँडसोबत वाढण्यासाठी सपोर्ट यांसारख्या विविध क्षेत्रातील तितक्याच प्रेरित आणि प्रेरित व्यावसायिकांसोबत भागीदारी करण्यास आम्ही उत्सुक असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)