SBI Clerk Recruitment 2022: बँकींग क्षेत्रात नोकरीची संधी, एसबीआयमध्ये नोकर भरती; जाणून घ्या पदसंख्या, पात्रता आणि अर्ज करण्याची मूदत
स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) अर्थातच एसबीआय (SBI) विविध पदांसाठी नोकरभर्ती करत आहे. खास करुन विविध श्रेणींसाठी ही पदभर्ती असल्याने शिक्षण आणि गुणवत्तेच्या जोरावर विविध गटातील पात्र तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे.
SBI Clerk Recruitment 2022: बँकींग क्षेत्रात नोकरी करु इच्छिणाऱ्या तरुण तरुणींसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) अर्थातच एसबीआय (SBI) विविध पदांसाठी नोकरभर्ती करत आहे. खास करुन विविध श्रेणींसाठी ही पदभर्ती असल्याने शिक्षण आणि गुणवत्तेच्या जोरावर विविध गटातील पात्र तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे. त्यामुळे इच्छुक व पात्र उमेदवार या पदांसाठी नक्की अर्ज करु शकतात. त्यासाठी जाणून घ्या एसबीआयचे नोटिफेकेशन, पदांची संख्या, पदनाम, पात्रता आणि अटी यांसह आवश्यक असलेले बरेच काही.
एसबीआय नेटीफिकेशननुसार प्रामुख्याने ही पदे क्लर्क श्रेणीतील आहेत. ज्युनियर असोसिएट (ग्राहक समर्थन आणि विक्री) असे यापदाचे नाव आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार एसबीआयची अधिकृत वेबसाइट https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers वर आपले अर्ज विहीत मुदतीत पाठवू शकतात. (हेही वाचा, Indian Post Job Recruitment: दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीची संधी, इंडिया पोस्ट कडून मेगाभरतीची घोषणा)
कोणकोणत्या राज्यात असेल भरती?
अहमदाबाद, बंगलोर, भोपाळ, बंगाल, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, जयपूर, केरळ, लखनौ/दिल्ली, महाराष्ट्र/मुंबई मेट्रो, महाराष्ट्र आणि ईशान्येकडील SBI बँक शाखेसाठी ही भरती असेल.
पदसंख्या
एसबीायने काढलेल्या नोटीफिकेशननुसार सुमारे 5008 रिक्त जागांसाठी ही भरती असेल.
परीक्षेचे स्वरुप, पात्रता व निवड प्रक्रिया
इच्छुक आणि पात्र उमेदवारांच्या अर्जांची छाननी झाल्यानंतर उमेदवारांना ऑनलाईन परिक्षेसाठी बोलावले जाईल. त्यासाठी नेव्हेंबर 2022 मध्ये परीक्षा घेतली जाण्याची शक्यता आहे. अर्ज करणारा उमेदवार किमान 20 तर कमाल 28 वयोमर्यादेतील असावा. निवड प्रक्रिया तीन पद्धतीने होईल. सुरुवातीला SBI लिपिक पूर्व परीक्षा 2022 त्यानंतर उमेदवारांना SBI लिपिक मुख्य परीक्षा 2022 द्यावी लागेल. शेवटी SBI लिपिक भाषा चाचणी 2022 होईल. अशा पद्धतीने निवड प्रक्रिया पार पडेल.
अर्ज, शुल्क आणि इतर माहिती
सामान्य / OBC / EWS श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज करण्यासठी 750 रुपये शुल्क आदा करावे लागेल. तर SC/ST/PwBD/ESM/DESM श्रेणीतील उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरण्याची आवश्यकता असणार नाही.
अर्ज कसा कराल?
SBI Clerk 2022 Recruitment साठी अर्ज करायचा असल्यास उमेदवारांनी https://bank.sbi/careers या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. या संकेतस्थळावर दिलेल्या अटींची पूर्तता आणि अर्जांची जोडणी करुन उमेदवार अर्ज भरु शकतात. लक्षात ठेवा अर्ज दाखल करण्यासाठी 27 सप्टेंबर 2022 ही अंतिम मुदत असेल. त्यामुळे अर्ज दाखल करण्यापूर्वी अर्जदारांनी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. अर्जात काही त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. अर्जात त्रुटी असतील किंवा अर्ज उशीरा प्राप्त झाल्यास तो बाद ठरवला जाऊ शकतो.