SBI Clerk Admit Card 2021: एसबीआय क्लर्क परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी; sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करू शकता हॉल तिकीट
स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) कनिष्ठ सहकारी (Junior Associates- Customer Support & Sales) भरती परीक्षेसाठी प्रवेशपत्रे जारी केली आहेत. एसबीआय लिपिक प्रारंभिक परीक्षेसाठी (Clerk Preliminary Exam) कॉल लेटर / प्रवेश पत्र आता बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे
स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) कनिष्ठ सहकारी (Junior Associates- Customer Support & Sales) भरती परीक्षेसाठी प्रवेशपत्रे जारी केली आहेत. एसबीआय लिपिक प्रारंभिक परीक्षेसाठी (Clerk Preliminary Exam) कॉल लेटर / प्रवेश पत्र आता बँकेची अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. हे अॅडमिट कार्ड तपासण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी थेट लिंक देण्यात आली आहे. एसबीआय क्लर्क प्रीलीम्स 13 जुलै 2021 रोजी घेतली जाणार आहे. एसबीआय, प्रीलीम्स परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करेल. जे विद्यार्थी पूर्वपरीक्षेच्या परीक्षेत पात्र ठरतील ते एसबीआय लिपिक मेन परीक्षेस बसतील.
एसबीआय क्लर्क प्रीलीम्ससाठी प्रवेश पत्र तपासण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा-
- बँकेची अधिकृत वेबसाइट उघडा आणि करिअर टॅबवर क्लिक करा
- त्यानंतर एक नवीन पेज उघडेल. त्यानंतर एसबीआय लिपिक प्रवेश पत्र अधिसूचना यावर क्लिक करा.
- त्यानंतर एक लॉगिन पेज उघडेल. त्याठिकाणी आपले युजरनेम, पासवर्ड/जन्मतारीख आणि सुरक्षा कोड प्रविष्ट करा व लॉगिनवर क्लिक करा.
- त्यानंतर आपले प्रवेशपत्र डाउनलोड करा. पुढील संदर्भासाठी त्याची एक प्रिंटआउट घ्या.
'लडाख' आणि 'लेह आणि कारगिल व्हॅली स्पेशल ड्राईव्ह' अंतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांव्यतिरिक्त एसबीआय लिपिक प्रवेश पत्र सर्वांसाठी रिलीज करण्यात आले आहे. पुढील सूचना येईपर्यंत या दोन भागातील भरती थांबवण्यात आली आहे. एसबीआय लिपिक मेन्स परीक्षा 31 जुलै 2021 रोजी होणार आहे. एसबीआय लिपिक भरती देशभरातील बँकांमधील 5000 हजार रिक्त जागा भरण्यासाठी केली जात आहे. (हेही वाचा: Indian Navy SSC IT Recruitment 2021: इंडियन नेव्हीमध्ये ग्रॅज्युएट, पोस्टग्रॅज्युएटसाठी नोकर भरती, जाणून घ्या अर्जप्रक्रियेसंबंधित अधिक)
या प्रवेश पत्रावर केंद्राचे नाव व पत्ता, परीक्षेची वेळ, उमेदवाराचा रोल नंबरसह परीक्षेसंबंधी महत्त्वपूर्ण माहिती असेल. उमेदवारांना प्रवेश पत्रातील तपशील तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि काही विसंगती आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडे त्वरित संपर्क साधावा असे सांगितले आहे. कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन करून या परीक्षा होतील.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)