इंटरव्यूमध्ये 50 वेळा नापास होऊनही Sampriti Yadav ने मानली नाही हार, शेवटी Google ने दिली 1 कोटींची नोकरी

त्यांनी दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक पदवी घेतली आहे.

Sampriti Yadav (PC - Facebook)

प्रयत्नांती परमेश्वर, अशी म्हण आपल्याकडे म्हटली जाते. जे लोक प्रयत्न करतात ते कधीही हार मानत नाहीत. त्यामुळे तुम्हाला जर यशाच्या शिखरावर जायचे असेल तर मेहनत सोडू नका. तुमची स्वप्ने कधीतरी नक्कीच पूर्ण होतील. बिहारमधील संप्रीती यादव (Sampriti Yadav) या 24 वर्षीय तरुणीने कठोर परिश्रम आणि समर्पणाच्या बळावर मोठी कामगिरी केली आहे. एक वेळ अशी होती जेव्हा संप्रिती यादव सलग 50 मुलाखतींमध्ये अपयशी ठरली. त्यावेळी तिच्याकडे कोणतीही नोकरी नव्हती.

50 मुलाखतींमध्ये नापास झाल्यानंतर गुगलमध्ये मिळाली नोकरी -

मात्र, एवढ्या अपयशानंतरही संप्रीतीने हार मानली नाही. आज त्यांना चार कंपन्यांच्या ऑफर आहेत. एवढेच नाही तर गुगलने त्याला 1.10 कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेजही ऑफर केले आहे. ज्याचा संप्रीतीने स्वीकार केला आहे. संप्रितीच्या या यशामुळे तिच्या कुटुंबीयांनाही तिचा अभिमान वाटत आहे. (वाचा - Telangana: सरकारी बसमध्ये प्रवास करण्यासाठी कंडक्टरने कोंबड्याचेही आकारले भाडे, पहा व्हिडिओ)

संप्रीती यादव 14 फेब्रुवारीपासून गुगलमध्ये काम करण्यास सुरुवात करणार आहेत. त्यांनी दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक पदवी घेतली आहे. गुगलमध्ये नोकरी मिळवणे संप्रीतीसाठी इतके सोपे नव्हते. यासाठी तिने परीक्षेच्या 9 फेऱ्या पार केल्या आहेत. गुगलने संप्रीतीच्या मुलाखतीच्या 9 फेऱ्या घेतल्या. या सर्व फेरीत संप्रीतीने प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. यानंतरच गुगलकडून एवढ्या मोठ्या पॅकेजसह संप्रीतीला नोकरीची ऑफर मिळाली.

मायक्रोसॉफ्टकडूनही मिळाली ऑफर -

संप्रीतीला मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून नोकरीची ऑफरही आली होती. गुगलच्या मुलाखतीसाठी तिने खूप मेहनत घेतल्याचे संप्रीतीने सांगितले. प्रत्येक फेरीत तिच्या उत्तराने अधिकारी समाधानी होते. संप्रीती सांगते की, जर तुम्हाला काही मोठं करायचं असेल, तर सर्वप्रथम तुमचं ध्येय निश्चित करा. यानंतर त्याच ध्येयानुसार तयारीला लागा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल. गुगलच्या लंडन ऑफिसमध्ये काम करण्याची संधी मिळावी, असे संप्रितीचे लहानपणापासूनच स्वप्न होते.