RRB Exams 2020: 15 डिसेंबरपासून सुरु होणार आरआरबी परीक्षा 2020; यंदा पोस्टाद्वारे मिळणार नाही Call Letters, जाणून घ्या RRB NTPC, Group D आणि इतर रेल्वे परीक्षांबद्दल महत्वाच्या गोष्टी
1.2 कोटींपेक्षा जास्त उमेदवारांची प्रतीक्षा जवळजवळ संपली आहे, कारण लवकरच ते येणाऱ्या आरआरबी एनटीपीसी (RRB NTPC), आरआरबी ग्रुप डी (RRB Group D) आणि Ministerial and Isolated श्रेणीतील पदांच्या भरती परीक्षांना हजेरी लावतील.
1.2 कोटींपेक्षा जास्त उमेदवारांची प्रतीक्षा जवळजवळ संपली आहे, कारण लवकरच ते आगामी आरआरबी एनटीपीसी (RRB NTPC), आरआरबी ग्रुप डी (RRB Group D) आणि Ministerial and Isolated श्रेणीतील पदांच्या भरती परीक्षांना हजेरी लावतील. रेल्वे भरती परीक्षा 15 डिसेंबर 2020 पासून सुरू होतील मात्र त्याआधी अशा अनेक गोष्टी आहेत ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अगोदर माहित असणे आवश्यक आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रकही लवकरच जाहीर होणे अपेक्षित आहे, दरम्यान, अशी अपेक्षा आहे की भरती परीक्षा एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये घेण्यात येतील.
संचालक मंडळाने सांगितले आहे की कोरोना विषाणू महामारीमुळे कॉल लेटर्स पोस्टद्वारे पाठविले जाणार नाहीत. उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ rrbcdg.gov.in वरच ते डाउनलोड करावे. आरआरबी परीक्षा 2020 जवळ आल्यामुळे या लेखात आम्ही आपल्याला आरआरबी एनटीपीसी, ग्रुप डी आणि इतर परीक्षांबद्दल अधिक देत आहोत.
आरआरबी एनटीपीसी, आरआरबी ग्रुप डी आणि आरआरबी Ministerial आणि Isolated प्रवर्गातील पद भरती परीक्षा 15 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. Ministerial आणि Isolated प्रवर्गासाठी निवड होणारी परीक्षा 15 डिसेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान घेण्यात येणार असून, 1,663 पदांच्या निवडीसाठी ही परीक्षा होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. मात्र 15 डिसेंबरपासूनच्या आरआरबी परीक्षा 2020 चे तपशीलवार वेळापत्रक अजून जाहीर झाले नाही. एकदा का ते जाहीर झाले की, उमेदवार आरआरबीच्या अधिकृत वेबसाइटवर परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक पाहू शकतील.
परीक्षा नोटीसमध्ये दिलेल्या तपशीलांनुसार परीक्षा सुरू होण्याच्या चार दिवस विद्यार्थ्यांना कॉल लेटर्स उपलब्ध करून दिले जातील. परीक्षेच्या दहा दिवस अगोदर, उमेदवारांना परीक्षेची तारीख आणि शहराच्या तपशीलांविषयी माहिती दिली जाईल. संगणक-आधारित चाचणीनंतर, शारीरिक कार्यक्षमता चाचणीसाठी उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल.
अधिकृत नोटीसनुसार, भारतीय रेल्वेला आरआरबी एनटीपीसी परीक्षेच्या 35,208 रिक्त पदांसाठी 1.2 कोटीपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. आरआरबी ग्रुप डीच्या 1,03,769 रिक्त पदांसाठी एकूण 1,15,67,248 अर्ज नोंदविण्यात आले आहेत. Ministerial आणि Isolated प्रवर्गाच्या पदांसाठी 1,663 पदांसाठी 1,02,940 अर्ज मिळाले आहेत.