PNB Recruitment 2020: पंजाब नॅशनल बँकेमध्ये 535 जागांसाठी भरती, 'ही' आहे अर्ज भरण्याची अंतिम तारीख

त्यासाठी येथे क्लिक करा.

Representational Image (Photo Credit: File Image)

PNB Recruitment 2020: कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि लॉकडाऊन (Lockdown) यामुळे अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. अनेकांच्या नोक-या गेल्या आहेत. अशा स्थितीत पंजाबन नॅशनल बँक (Punjab National Bank) कडून एक दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. पंजाब नॅशनल बँकमध्ये संपूर्ण भारतासाठी (India एकूण 535 जागांसाठी भरती निघाली आहे. यात आर्किटेक्ट (Architect), इकॉनॉमिक्ससह (Economics) अन्य विभागात मॅनेजर (Manager), सिनियर मॅनेजर (Senior Manager) जागांसाठी भरती निघाल्या आहेत. भारत सरकारच्या या बँकेत निघालेली ही भारती बेरोजगारांसाठी आणि पात्र उमेदवारांसाठी सुवर्णसंधी असेल.

या पदांसाठी अर्ज भरण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.

पाहूयात कोणकोणत्या जागांसाठी निघाली भरती

पद क्र. पदाचे नाव  ग्रेड/स्केल  पद संख्या
1 मॅनेजर (रिस्क) MMG-II 160
2 मॅनेजर (क्रेडिट) MMG-II 230
3  मॅनेजर (ट्रेझरी) MMG-II 30
4 मॅनेजर (लॉ) MMG-II 25
5 मॅनेजर (आर्किटेक्ट) MMG-II 2
6 मॅनेजर (सिव्हिल) MMG-II 8
7 मॅनेजर (इकॉनॉमिक्स) MMG-II 10
8 मॅनेजर (HR) MMG-II 10
9 सिनियर मॅनेजर (रिस्क) MMG-III 40
10 सिनियर मॅनेजर (क्रेडिट) MMG-III 50
एकूण 535

हेदेखील वाचा- SBI Recruitment 2020: एसबीआय मध्ये 92 स्पेशलिस्ट केडर अधिकारी पदाची भरती; 'असा' करा अर्ज

वयाची अट:

08 सप्टेंबर 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा:

ऑनलाईन (ऑक्टोबर/नोव्हेंबर)

अर्ज करण्याची शेवटची तारीख:

29 सप्टेंबर 2020

परीक्षा फी:

Gen/OBC-850 रुपये

SC/ST/PWD-175 रुपये

या पदांसाठी अर्ज भरण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. दरम्यान स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) शुक्रवारी विविध तज्ज्ञ संवर्गातील अधिकारी असलेल्या 92 रिक्त पद भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 18 सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. इच्छुक उमेदवार 8 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरू शकतात.