Pariksha Pe Charcha 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विद्यार्थ्यांना देणार परीक्षेच्या तणावातून मुक्ती मिळवण्याचा मंत्र; 2 कोटींहून अधिक जणांनी केली नोंदणी
शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल, नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून परीक्षेवर विद्यार्थ्यांशी पंतप्रधानांची चर्चा पाहण्याची विनंती केली आहे.
Pariksha Pe Charcha 2024: बोर्डाच्या परीक्षेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सोमवारी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आणि त्यांना परीक्षेदरम्यानच्या तणावावर मात करण्याचा मंत्र देणार आहेत. यादरम्यान ते विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतील. यंदा भारत आणि परदेशातील 2.27 कोटींहून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी या कार्यक्रमासाठी स्वतःची नोंदणी केली आहे. जो एक विक्रम आहे. भारत मंडपममध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमासाठी तीन हजार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, त्यांना हा कार्यक्रम प्रत्यक्ष पाहता आणि ऐकता येणार आहे.
देशभरातील शाळा आणि विद्यापीठांमध्ये थेट प्रक्षेपण -
शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल, नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून परीक्षेवर विद्यार्थ्यांशी पंतप्रधानांची चर्चा पाहण्याची विनंती केली आहे. यासोबतच देशभरातील शाळा आणि विद्यापीठांमध्येही दाखवण्यास सांगितले आहे. (हेही वाचा - Maharashtra Board Exam 2024: महाराष्ट्र बोर्डाचा मोठा निर्णय; आता 10वी आणि 12वी च्या परीक्षांमध्ये पेपर वाचण्यासाठी दहा मिनिटांचा अतिरिक्त वेळ मिळणार नाही)
विद्यार्थ्यांशी परीक्षेबाबत पंतप्रधान मोदींच्या चर्चेची ही सातवी आवृत्ती आहे. पंतप्रधानांनी या उपक्रमाची सुरुवात 2018 पासून केली. तेव्हापासून हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहे. यासाठी विद्यार्थी बराच दिवसांपासून वाट पाहत होते. कार्यक्रमाची लोकप्रियता दरवर्षी वाढत्या नोंदणीवरून दिसून येते. गेल्या वर्षी या चर्चेसाठी 31 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.