NEET UG Result 2023 चा निकाल आज neet.nta.nic.in वर जाहीर होण्याची शक्यता; neet.nta.nic.in वर असे पहा स्कोअरकार्ड

निकालामध्ये आता कॅटेगरी नुसार कट ऑफ मार्क्स, पर्सेंटाईल रॅन्क्स दिले जातील. टॉपर्सची देखील यादी प्रसिद्ध केली जाईल.

Results | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

National Testing Agency कडून आज (13 जून) National Eligibility cum Entrance Test (NEET) UG 2023 चा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. मेडिकल मध्ये शिक्षण घेऊ इच्छिणारे अनेक विद्यार्थी या परीक्षेच्या निकालाची वाट पाहत आहेत. neet.nta.nic.in या वेबसाईट वर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे. निकालानंतर प्रवेशाची पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे. neet.nta.nic.in किंवा neetresults.nic.in किंवा nta.ac.in वर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्याची सोय उपलब्ध असणार आहे.

भारतामध्ये मणिपूर वगळता देशभर 7 मे दिवशी नीट ची परीक्षा पार पडली होती. मणिपूर मध्ये 6 जून दिवशी परीक्षा झाली आहे. या परीक्षेची अर्थात NEET UG answer key 4 जून दिवशी रिलीज करण्यात आली आहे आणि 6 जून पर्यंत आक्षेप नोंदवण्याची वेळ होती त्यामुळे आता विद्यार्थ्यांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

कसा पहाल नीट परीक्षेचा निकाल?

(नक्की वाचा: NEET PG Admission: पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांमध्ये सेवारत अधिकाऱ्यांना 20% आरक्षण; सर्वोच्च न्यायालाकडून राज्य सरकारचा निर्णय कायम). 

दरम्यान यंदा नीटच्या परीक्षेला 21 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी सामोरे गेले आहेत. निकालामध्ये आता कॅटेगरी नुसार कट ऑफ मार्क्स, पर्सेंटाईल रॅन्क्स दिले जातील. टॉपर्सची देखील यादी प्रसिद्ध केली जाईल. एनटीए कडून निकालाची आज प्रतिक्षा असल्याने तुम्हांला वेबसाईट्स वरील अपडेट्स तपासत रहावं लागणार आहे.