NEET 2022 Result Date: NTA कडून नीट 2022 निकालाची तारीख जाहीर; पहा neet.nta.nic.in वर कधी, कसे पाहू शकाल मार्क्स
परीक्षार्थ्यांना त्यांच्या रजिस्टर इमेल आयडी वर आन्सर की, ओएमआर शीट पाहता येणार आहे.
NEET 2022 परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजेंसी कडून जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशन मध्ये नीट 2022 परीक्षेची तारीख (NEET 2022 Result Date) आणि आन्सर की जारी करण्याची देखील तारीख प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिकृत माहितीनुसार नीट 2022 परीक्षेचानिकाल 7 सप्टेंबर 2022 दिवशी प्रसिद्ध होणार आहे. हा निकाल विद्यार्थी अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in वर पाहू शकणार आहेत.
नीट 2022 निकालापूर्वी एनटीए त्यांची आन्सर की 30 ऑगस्ट दिवशी प्रसिद्ध करणार आहेत. परीक्षार्थ्यांना त्यांच्या रजिस्टर इमेल आयडी वर आन्सर की, ओएमआर शीट पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल आन्सर की वर ऑनलाईन आपला आक्षेप नोंदवता येणार आहे. त्यासाठी खिडकी 30 ऑगस्ट पासून सुरू होण्याची शक्यता आहे. ही खिडकी अंदाजे 24-48 तास खुली ठेवली जाईल. प्रत्येक प्रश्नासाठी 200 रूपये मोजावे लागणार आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नीट निकाल 7 सप्टेंबरला जाहीर होईल.
कसा पहाल निकाल?
- अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in ला भेट द्या.
- होम पेज वर ‘NEET UG RESULT 2022’ची लिंक (निकाल प्रसिद्ध झाल्यावर) दिसेल. त्यावर क्लिक करा.
- आता एक नवं पेज ओपन होईल. त्यावर विचारण्यात आलेले तपशील सबमीट करा.
- तुमचा NEET UG Result स्क्रिन वर दिसेल.
- आता हा निकाल तुम्ही डाऊनलोड करून प्रिंट देखील करू शकता.
हे देखील नक्की वाचा: JEE Advanced Admit Card 2022 Released; 28 ऑगस्टपूर्वी jeeadv.ac.in वरून असं डाऊनलोड करा हॉल तिकीट .
यंदा परीक्षेला 95% रजिस्टर विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. ही आतापर्यंतची उच्चांकी संख्या आहे. यंदा 18,72,329 विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झाले होते. त्यापैकी 10.64 लाख महिला परीक्षार्थी होत्या.